शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

मला मराठी येत नाही, तक्रार अर्ज इंग्रजीत द्या; एमटीएनएलच्या अधिकाऱ्याला मराठीचं वावडं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 6:55 PM

आमची नियुक्ती दिल्लीतून झालीय, महाराष्ट्रातून नाही. त्यामुळे मला मराठी येणे सक्तीचे नाही; अधिकाऱ्याचं उत्तर

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे: इंग्रजीतच तक्रार अर्ज द्या असा आग्रह धरणाऱ्या महानगर टेलीफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) एका अमराठी अधिकाऱ्याने मराठीत दिलेला तक्रार अर्ज घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. तो तक्रार अर्ज केवळ मराठीत असल्याने त्या अधिकाऱ्याने त्या अर्जाची स्वतः दखल न घेता ती तक्रार नंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवली. आम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याने आम्हाला मराठी येणे सक्तीचे नाही असे उत्तर तक्रारदाराला देण्यात आले.गेले 15 दिवस दोन्ही दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने बुधवारी लेखी तक्रार अर्ज एन्व्हायरो व्हिजनच्या कळवा रुग्णालयातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातर्फे त्या अधिकाऱ्याला देण्यात आला. यावेळी त्यांना अधिकाऱ्याच्या या उत्तराला सामोरे जावे लागले. आपत्कालीन सेवा असलेले कळवा रुग्णालयातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राचा गेले 15 दिवस या केंद्रातील दोन्ही दूरध्वनी क्रमांक बंद आहे. त्यात कोरोनाच्या संकट काळात हे दोन्ही क्रमांक बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात एमटीएनएलला या आधी वारंवार दूरध्वनीवरून तक्रार केल्या पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून घनकचरा व्यवस्थापन केंद्रातर्फे आज लेखी तक्रार अर्ज देण्यात आला. या केंद्रातील कर्मचारी ही तक्रार घेऊन गेले असता एमटीएनएलचे सहाय्यक व्यवस्थापक अखिल सत्यम यांनी ही तक्रार मराठीत असल्याने घेण्यास सुरुवातीला नकार दिला. यावेळी केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. विद्याधर वालावलकर यांनी सत्यम यांच्याशी संपर्क केला असता त्यांना दूरध्वनी दुरुस्त करणारा कर्मचारी कोरोनाची भीती असल्याने तो दुरुस्तीसाठी येऊ शकत नाही. तसेच, तुमचा अर्ज मला मराठीपेक्षा इंग्रजीत द्या, मला मराठी वाचता येत नाही. आम्हाला मराठी येणे सक्तीचे नाही, एमटीएनएलचा एम म्हणजे महानगर आहे, महाराष्ट्र नाही असे उत्तर दिले. आम्ही अर्ज इंग्रजीत का द्यायचा असा सवाल वालावलकर यांनी त्यांना केला आणि तो तक्रार अर्ज सत्यम यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची सूचना वालावलकर यांनी आपल्या कर्मचाऱ्याला केली. तो अर्ज जरी स्वीकारण्यात आला असला तरी आपत्कालीन सेवेसाठी वापरण्यात येणारा बंद दूरध्वनी दुरुस्त करण्यासाठी अद्याप एमटीएनएलचा कर्मचारी तेथे पोहोचलेला नाही. यावेळी सत्यम याना संपर्क केला असता ते म्हणाले, माझ्याकडे तक्रार अर्ज हा इंग्रजीत आला तर मी स्वीकारतो. मराठीत आला तर मी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवतो. माझी नियुक्ती ही दिल्लीहून झाली आहे, महाराष्ट्रातून नाही त्यामुळे मला मराठी येणे सक्तीचे नाही. तसेच, आमचा कर्मचारी कळवा रुग्णालयातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात जाण्यास तयार नाही, ते पीपीइ किट मागत आज आणि हा किट आमही देऊ शकत नाही तो रुग्णालयाने द्यावा असे सत्यम यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबद्दल समजल्यावर मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यानी सत्यम यांची कानउघडणी केली. पाचंगे म्हणाले, वालावलकर यांनी मला या प्रकरणाची माहिती दिली, कोरोना असल्यामुळे सत्यम यांची कानउघडणी फोनवरून केली आहे. पुन्हा असा प्रकार घडल्यास अशा अधिकाऱ्यांची 'कान'उघडणी प्रत्यक्षात जाऊन ते ही मनसे स्टाईलने केली जाईल. पाचंगे यांनी एमटीएनएलचे डिजीएम बोरुले यांच्याशी संपर्क करून असा प्रकार पुन्हा घडणार नाही याबाबत आश्वासन घेतले. 

टॅग्स :MTNLएमटीएनएल