शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अलाहाबाद येथून ठाणे स्थानकात भरकटलेली मुलगी स्वगृही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:02 IST

ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोनवर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मोनाली (नावात बदल) ही दहा वर्षांची मुलगी रडत असल्याचे ठाण्यातील आरपीएफ जवानांच्या लक्षात आले. 

ठाणे : भावाशी झालेल्या भांडणातून अलाहाबाद येथून रेल्वेने मुंबईत बहिणीकडे जात असताना ठाणे स्थानकात भरकटलेल्या अल्पवयीन मुलीला शनिवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी तिच्या बहिणीच्या सुपूर्द केले. आरपीएफने दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे आपली बहीण सुखरूप परत मिळाल्यामुळे मुंबईतील साकीनाका येथील तिच्या बहिणीने पोलिसांसह रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोनवर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मोनाली (नावात बदल) ही दहा वर्षांची मुलगी रडत असल्याचे ठाण्यातील आरपीएफ जवानांच्या लक्षात आले. प्रचंड भेदरलेली ही मुलगी सुरुवातीला कोणाशी काहीच बोलायला तयार नव्हती. त्यामुळे तिचा नेमकी पत्ताही शोधणे अवघड झाले होते. आरपीएफचे प्रमोद देने आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या सुस्मिता काटकर यांनी आरपीएफच्या कार्यालयात आणून तिला विश्वासात घेतले. तेव्हा ती मूळची अलाहाबाद येथे राहणारी असून भाऊ आणि भावजयीबरोबर तिचे भांडण झाले. त्यामुळे रागातून मुंबईतील बहिणीकडे रेल्वेने जात असल्याचे तिने या आरपीएफच्या पोलिसांना सांगितले. केवळ एका चिठ्ठीवर बहिणीचा मोबाइल क्रमांक तिच्याकडे होता. यापलीकडे मुंबईत कुठे जायचे, याची काहीच माहिती तिच्याकडे नव्हती. तिच्याकडील त्या मोबाइल क्रमांकाच्या आधाराने कुर्ला, साकीनाका येथील तिच्या बहिणीकडे पोलीस उपनिरीक्षक सोनाली मलैया यांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुखरूप बहिणीच्या स्वाधीन केले. आपली बहीण सुखरूप मिळाल्यामुळे या बहिणीचे डोळे पाणावले होते. बहीण सुखरूप परत मिळाल्यामुळे तिच्या बहिणीने पोलिसांसह रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. 

टॅग्स :thaneठाणे