शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारीपदी आता गिरीष झळके

By जितेंद्र कालेकर | Updated: March 4, 2020 20:50 IST

ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशीकांत काळे यांचीही पुन्हा मुंबई महापालिकेमध्ये बदली झाली आहे. काळे हे गेल्या चार वर्षांपासून मुंबईतून ठाण्यात प्रतिनियुक्तीवर दाखल झाले होते. त्यांच्या जागी गिरीष झळके यांच्याकडे ठाण्याच्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

ठळक मुद्देशशीकांत काळे पुन्हा मुंबईत परतलेचार वर्षांपासून होते ठाण्यात प्रतिनियुक्तीवर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी कार्यमुक्त होत असल्याचे जाहीर करताच अवघ्या काही तासांमध्येच ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशीकांत काळे यांचीही पुन्हा मुंबई महापालिकेमध्ये बदली झाली आहे. काळे हे गेल्या चार वर्षांपासून मुंबईतून ठाण्यात प्रतिनियुक्तीवर दाखल झाले होते. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा गिरीष झळके यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील उपमुख्य अग्निशमन अधिकारी काळे यांची काही अटी शर्थींवर २ जून २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. याच पार्श्वभूमीवर काळे हे ६ जून २०१६ रोजी ठाण्यात मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर रुजू झाले होते. काळे यांची मुंबई महापालिकेनेही मागणी केल्यामुळे त्यांना ३ मार्च २०२० पासून ठाणे महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांची सेवा मुळ विभागाकडे प्रत्यावर्तीत करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर अधिकारी उपलब्ध होईपर्यंत प्रशासकीय कारणास्तव मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार विभागीय अधिकारी झळके यांच्याकडे सोपविण्याचे आदेश ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ३ मार्च रोजी काढले आहेत.

‘‘ शशीकांत काळे यांची मुळची नियुक्ती ही मुंबई महापालिकेचीच होती. मुंबई महापालिकेने त्यांची मागणी केली असल्यामुळे त्यांना आयुक्तांच्या आदेशाने ठाण्यातून कार्यमुक्त केले. त्यांच्या जागी सेवाजेष्ठतेमध्ये वरिष्ठ असलेल्या गिरीष झळके यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.’’ओमप्रकाश दिवाटे, उपायुक्त, मुख्यालय, ठाणे महापालिका.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाfireआग