शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

‘त्या’ गर्डरला लोखंडी फ्रेमचा आधार

By admin | Updated: January 14, 2017 06:27 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला

धीरज परब / मीरा रोडमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस आधार दिला जाणार आहे. त्यासाठी मेरीटाइम बोर्डाला कळवण्यात आले आहे. त्यांची परवानगी मिळताच आयआरबी काम सुरू करणार आहे. या कामासाठी सुमारे दीड महिना लागण्याची शक्यता असली तरी कामादरम्यान सध्या सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूक बंद करावी लागणार नाही. परंतु, दुरुस्तीनंतर १५ टनांपेक्षा जास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदच ठेवावी लागणार असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. जुन्या पुलाच्या गर्डरला मोठा तडा गेल्याचे निदर्शनास आल्याने गेल्यावर्षी सप्टेंबरपासून जुन्या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. गर्डरला गेलेला तडा कशा पद्धतीने दुरुस्त करावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयआरबीच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी पाहणी केली. २०१३ मध्ये गर्डरला तडा गेला असता तो भाग पूर्णपणे बदलण्यात आला होता. पण, आता गेलेला तडा ज्या भागात आहे, तेथेगर्डर बदलणे अशक्य होते. प्राधिकरणाने या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. व्ही.के. रैना यांना पाचारण केले. मूळ बांधकामाच्या सुमारे ९८ नकाशांपैकी केवळ १० ते १२ नकाशेच सापडल्याने दुरुस्तीचा मार्ग खुंटला. अखेर, प्राधिकरणाने ब्रिटिश कंपनी रॅमबोलचे पॉल जॅक्सन यांना बोलावले. ३ आॅक्टोबरला जॅक्सन यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल दिला. रॅमबोल कंपनीने सुचवल्यानुसार अतिउच्च दर्जाच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस) आधार तडा गेलेल्या गर्डरला देण्यात येणार आहे. त्यासाठी खाडीत उतरून काम करावे लागणार आहे. दोन्ही बाजंूच्या पिलरच्या आधारे ही फ्रेम उभारली जाणार आहे. आयआरबीच हे काम करणार आहे. या कामामुळे एका गाळ्याची उंची कमी होणार असल्याने मेरीटाइम बोर्डाची परवानगी लागणार आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच पत्र दिले आहे. बोर्डाची मंजुरी मिळाल्यावर काम सुरू केले जाणार आहे. सध्या किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असे प्राधिकरणाचे व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही अवजड वाहनांची वाहतूक बंदच ठेवावी लागणार आहे. वेगमर्यादेचे काटेकोर पालन करत २० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवता येणार नाही.