महाकाय ट्रेलरमुळे कसारा घाटात कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:15 AM2020-11-21T00:15:09+5:302020-11-21T00:15:14+5:30

वाहनांच्या रांगा : पोलिसांना करावी लागली तारेवरची कसरत

Giant trailer traps Kasara Ghat | महाकाय ट्रेलरमुळे कसारा घाटात कोंडी

महाकाय ट्रेलरमुळे कसारा घाटात कोंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : मुंबई येथून महाकाय ट्रेलर भिवंडीहून छत्तीसगड येथे जात असताना शुक्रवारी सकाळी कसारा घाट चढण्याच्या वेळी वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, या ट्रेलरला आठ किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्ब्ल आठ तास लागले.


सकाळी ८ वाजता कसारा बायपास येथून कसारा घाट सर करण्यासाठी मशिनरी घेऊन जाणारा २६० चाकांचा ट्रेलर वाहतुकीला अडसर ठरत होता. नवीन कसारा घाटातील नाशिक-मुंबई लेनवरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. या ट्रेलरने दुपदरी रस्ता पूर्ण अडवून ठेवला होता. परिणामी, या ट्रेलरमुळे उंबरमाळी ते चिंतामणवाडीदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अमोल वालझाडे व कर्मचारी कार्यरत होते. या ट्रेलरला इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागणार आहे.

वाढत्या वाहतूककोंडीमुळे अपघाताचा धोका 
महाकाय ट्रेलरच्या वाहतुकीच्या वेळी महामार्ग बंद करण्याकरिता केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून परवानगी आणल्याचे सांगण्यात येत असले, तरी अशी परवानगी ही नाममात्र असून अशा प्रकारचे ट्रेलर जाण्यापूर्वी वाहतुकीत बदल करावा लागतो. तो बदल केल्यावर एका मार्गिकेवर वाहतुकीचा ताण येतो. परिणामी, वाढत्या वाहतूककोंडीमुळे अपघाताची शक्यता अधिक वाढते.
ट्रेलरला पोहचण्यास लागणार तीन महिने
२६० चाकांच्या या महाकाय ट्रेलरला इच्छित स्थळी पोहचण्यासाठी तब्बल तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागणार असल्याने ३ महिने मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग काही ठिकाणी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Web Title: Giant trailer traps Kasara Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.