शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

घोडबंदर ते गेट वे आॅफ इंडिया एक तासात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:46 IST

जलवाहतूक दुसरा टप्पा : रस्ते वाहतुकीवरील भार २० टक्क्यांनी होणार कमी

ठाणे : जलवाहतुकीचे दोन्ही टप्पे पूर्ण केल्यावर घोडबंदर येथून मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया येथे केवळ एक तासात पोहचणे शक्य होणार आहे.जलवाहतुकीच्या ठाणे-कल्याण-वसई या फेज-१ ला केंद्राची तसेच राज्याची तत्त्वत: मान्यता मिळाल्यानंतर आता फेज-२ चा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने सुरू केले आहे. ठाणे ते गेट वे आॅफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज-२ चा जलमार्ग आहे. याचा शक्याशक्यता अहवाल तयार केला असून तो २४ एप्रिल रोजी सादर केल्यानंतर डीपीआर तयार करण्याची अनुमती राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील जलवाहतुकीमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा भार २० टक्क्यांनी हलका होणार असून, घोडबंदरहून मुंबईला जाण्यासाठी सध्या दोन तास लागतात, तोच प्रवास एक तासात पूर्ण होणार असल्याचा दावा ठामपाने केला.ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार दुसºया टप्प्यातील वाहतुकीमध्ये साकेत खाडीकडून ही जलवाहतूक सुरू होणार असून त्यानंतर गेट वे आॅफ इंडिया व्हाया ट्रॉम्बे, एलिफंटा, फेरी वार्फत्याचप्रमाणे ठाणे ते नवी मुंबई (पनवेल, जेएनपीटी) असा जलमार्ग असणार आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार केल्यानंतर तो केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल. त्यानंतर केंद्र तसेच राज्य शासन डीपीआर तयार करण्याची परवानगी ठाणे महापालिकेला देईल. डीपीआर तयार करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. येत्या तीन महिन्यांत डीपीआर तयार करण्यात येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर, जानेवारी २०१८ रोजी या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली. आता २४ एप्रिल रोजी हा अहवाल सादर केल्यानंतर अखेर फेज-२ चा डीपीआर तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाची मान्यता मिळाली असून लवकरच या कामालादेखील सुरु वात होण्याची चिन्हे आहेत.जलवाहतूक हा रस्ते वाहतुकीला सक्षम पर्याय ठरल्यास सध्या ठाणे व मुंबईत होणारी वाहतूककोंडी बºयाच अंशी कमी होईल.असा आहे फेज-२ चा मार्गठाणे ते मुंबईचा जलमार्ग ठाणे (साकेत) पासून जलवाहतुकीला सुरु वात होणार असून त्यानंतर कळवा-विटावा-मीठबंदर-ऐरोली-वाशी-ट्रॉम्बे-एलिफंटा-फेरी वार्फ-गेट वे आॅफ इंडिया.ठाणे-नवी मुंबईचा मार्गदेखील साकेतपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वाशी-नेरूळ-बेलापूर-तळोजा-तर एक मार्ग बेलापूर हा पनवेलला जोडण्यात येणार असून व्हाया जुईनगरला जाणार आहे. तर, अजून एक मार्ग जेएनपीटी आणि उरणमार्गे नेरूळला जाणार आहे.

टॅग्स :Travelप्रवास