शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

निचऱ्याअभावी घोडबंदर यंदाही तुंबणार

By admin | Updated: June 15, 2017 03:01 IST

मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका घोडबंदर भागातील अनेक वसाहतींना बसला होता. येथील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका घोडबंदर भागातील अनेक वसाहतींना बसला होता. येथील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील मुख्य रस्त्यावरील मोऱ्यांचे रुंदीकरण करण्याचा महत्त्वाचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता पावसाळा सुरू झाला, तरी हा प्रस्ताव कागदावरच आहे. मोऱ्या बांधण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून रस्ते विकास महामंडळाने या कामाचा खर्च महापालिकेने द्यावा, असा प्रस्ताव दिला आहे. रस्ते विकास महामंडळाने हात वर केल्याने पालिकेने आता यासाठी आवश्यक असलेला ८ कोटी निधी खर्च करण्याची तयारी दर्शवली असली तरी ही प्रक्रि या पूर्ण होण्यास काही कालावधी जाणार असल्याने यंदाही घोडबंदर परिसर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांत घोडबंदर भागात झपाट्याने नागरीकरण झाले आहे. अनेक विकासकांचे मोठमोठे विकास प्रकल्प या भागात उभे राहत आहेत. याच भागात राज्य सरकारने काही विशेष नागरी वसाहतींना परवानगी दिली असून लोढा, रुस्तमजी, कल्पतरू, हिरानंदानी अशा बड्या बिल्डरांच्या टोलेजंग वसाहतींमधून हजारोंच्या संख्येने कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आली आहेत. दिवसागणिक ही संख्या वाढू लागल्याने घोडबंदर मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण वाढला आहे. एकीकडे येथील वाहतूककोंडी दूर करण्याचे आव्हान पोलीस आणि महापालिका प्रशासनापुढे असतानाच दुसरीकडे पावसाळ्यात या मार्गावर पूरपरिस्थिती निर्माण होऊ लागल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढू लागली आहे. या मार्गावरील कापूरबावडीनाका ते गायमुखदरम्यान मुख्य रस्त्यावरील अरुंद मोऱ्यांमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाने केलेल्या पाहणीत आढळून आले. या अरुंद मोऱ्यांमुळे पातलीपाडा जंक्शन, वाघबीळनाका, ओवळा चौक आणि गायमुख भागात प्रामुख्याने पाणी तुंबत असल्याचे निदर्शनास आले. हा परिसर, मुख्य रस्ता, आसपासच्या वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मागील वर्षी येथील रहिवासी हैराण झाले होते. या परिस्थितीमुळे घोडबंदर मार्गावर नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहप्रकल्पांमधील घरांच्या विक्रीवरदेखील परिणाम होण्याची भीती बिल्डरांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे महापालिकेने यातून तत्काळ मार्ग काढावा, असा आग्रह बिल्डरांनीही धरला होता. पालिकेने आता या प्रकल्पासाठी सविस्तर अहवाल तयार केला असून या कामासाठी ७ कोटी ९५ लाख रु पयांचा निधी रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. परंतु, प्रत्यक्षात हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच कामाला सुरुवात होणार असल्याने यंदाही घोडबंदरला पुराच्या पाण्याचा धोका कायम राहणार असल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ते विकास महामंडळातील संबंधितांबरोबर बैठक घेऊन मोऱ्या रु ंद करण्याचा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, रस्ते विकास महामंडळाने तब्बल १० कोटी रु पयांचे अंदाजपत्रक तयार केले. या कामासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे यासाठी अर्थसहाय्य मागण्यात आले. मात्र, हे काम तातडीने करायचे असल्याने एमएमआरडीएने त्यासाठी घाईघाईने अर्थसहाय्य देण्यास असमर्थता दर्शवली होती.त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने पुन्हा महापालिकेकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव मांडला. या सगळ्या प्रक्रि येत संपूर्ण वर्ष सरले आहे. त्यात आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु, अद्यापही या वाटाघाटीत रस्त्यांच्या मोऱ्यांचे काम मात्र सुरू झालेले नाही.