शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वरसावे नाका ते काजूपाडापर्यंतचा घोडबंदर मार्ग यंदाही पाण्याखाली जाण्याची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 16:23 IST

वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात .

मीरारोड - इको सेन्सेटिव्ह झोन असून देखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावा मुळे वरसावे  नाका ते काजूपाडा दरम्यानच्या घोडबंदर महामार्गावर यंदासुद्धा पावसाळ्यात पाणी साचून रस्ता बंद होण्याची भीती आहे . वाहतूक पोलिसांनी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह ह्या भागाची पाहणी केली .  परंतु मीरा भाईंदर महापालिकेने मात्र ह्या पाहणी कडे पाठ फिरवत समस्ये बाबत गांभीर्य दाखवले नाही . 

वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात . हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन आहे . वरसावे येथील अनुहा लॉज जवळच्या परिसरात प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे . येथून महामार्गाचे खालून जाणारी नैसर्गिक उपखाडी तर भराव करून अतिशय अरुंद केली असून महापालिकेने तर चक्क काँक्रीटचे बांधकाम करून टाकले आहे. 

एक्स्प्रेस इन हॉटेल जवळून जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सुद्धा नावापुरताच उरला आहे . येथील सी एन रॉक हॉटेल परिसरात प्रचंड माती भराव झाला आहे . चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रातच प्रचंड भराव करून नदीचे पात्र अरुंद बनले आहे . शिवाय परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात भराव झालेले आहेत . 

इको सेन्सेटिव्ह झोन तसेच नदी व ओढे आणि परिसरात गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड भराव मुळे पावसाळ्यात येथील घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात आहे . जेणे करून ह्या महार्गावरील वाहतूक सुद्धा ठप्प होते . तसेच चेणे गावात सुद्धा पूर येतो . 

स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी पाड्यातील  रहिवाश्यांनी ह्या भरावा विरोधात तक्रारी केल्या असल्या तरी त्यांना कोणी दाद देत नाही . येथिल अजय पाठक ह्यांनी तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . न्यायालयाने आदेश देऊन देखील महापालिकेने अजून काही कारवाई केलेली नाही. 

घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मीरा भाईंदर महापालिकेस पत्र दिले होते . परंतु पालिकेने सदर रस्ता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करण्याचे वाहतूक शाखेला कळवले असे सूत्रांनी सांगितले. 

त्या अनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे , उपनिरीक्षक एम . जी . पाटील सह ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिंदे , हिवरे , खिलारे यांनी संयुक्तपणे वरसावे नाका ते काजूपाडा भागाची पाहणी केली . यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना करता येतील ह्यावर चर्चा झाली . ह्या पाहणी दौऱ्या नंतर आवश्यक कार्यवाहीचा अहवाल नुसार पुढील पावले उचलली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर