शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोच्या चिखलाने घोडबंदर रोड पाच तास बंद; ताबा सुटल्याने ट्रक उलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 07:41 IST

मानपाडा पुलावर कंटेनर बिघडला

ठाणे : घोडबंदरवासीयांची वाहतूककोंडी पाठ काही सोडत नाही. मंगळवारी घोडबंदर रोडमार्गे बोरीवलीला जाणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने टोमॅटोचा ट्रक पातलीपाडा उड्डाणपुलावर उलटला. पहाटे चार ते सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे दोन ते तीन टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरशः चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील ऑइल रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

पाच तासांच्या प्रयत्नानंतर उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत होत असताना सकाळी ११ च्या सुमारास मानपाडा उड्डाणपुलावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कंटेनरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महेंद्र गुप्ता यांच्या मालकीच्या ट्रकमधून सुमारे दोन ते तीन टन टोमॅटो हे शिरपूर येथून घोडबंदर रोडवरून चालक बोरीवलीला घेऊन निघाला होता. ठाण्यातून जाताना पातलीपाडा उड्डाणपुलावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक उलटला. या घटनेत ट्रकमधील टोमॅटो रस्त्यावर पसरले तसेच तेलही सांडले. 

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी या विभागांनी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून घटनास्थळावरून ट्रकचालक पळून गेला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक हायड्रा मशीनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आला.याशिवाय पातलीपाडा उड्डाणपुलावरती पडलेले टोमॅटो जेसीबीने घंटागाडीत भरण्यात आले. घनकचरा विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने टोमॅटो उचलण्यात आले, तर टोमॅटो पडून चिखल झालेल्या रस्त्यावर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारून तो रस्ता साफ करण्यात आला. 

विद्यार्थ्यांना लेटमार्कमानपाडा येथील उड्डाणपुलावर कंटेनर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककाेंडी झाली. या कोंडीतून सुटण्यासाठी वाहन चालकांनी हिरानंदानीमार्गे आझादनगर, ढोकाळी या मार्गाचा अवलंब केला. मात्र, एकाच वेळी अनेक वाहने येथील अंतर्गत रस्त्यांवर आल्याने या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी कंटेनर हटविण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर संथ गतीने वाहतूक सुरू झाली; परंतु यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना काहीसा लेटमार्क लागला.

माती टाकल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरूसांडलेल्या तेलावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांमार्फत माती टाकण्यात आली. त्याच्यानंतर पातलीपाडा उड्डाणपूल सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणेAccidentअपघात