शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 19:59 IST

मीरा भाईंदर मधील गाजत असलेल्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ठाणे न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे .

मीरा रोड - मीरा भाईंदर मधील गाजत असलेल्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ठाणे न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे . बनावट यूएलसी प्रमाणपत्र द्वारे रहिवास क्षेत्र असताना हरित क्षेत्र दाखवून इमारती उभारून शासनाला १०२ कोटी रुपयांना चुना लावणाऱ्या अधिकारी व बिल्डर यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी नव्याने तपास करून मीरा भाईंदर महापालिकेचे निवृत्त सहाय्यक नगररचनाकार सत्यवान धनेगावे, वास्तुविशारद चंद्रशेखर लिमये, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आरेखक असलेले भरत कांबळे या तिघांना १० जून रोजी अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची रवानगी ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

 तर या घोटाळ्यातील मुख्य पाहिजेत आरोपी महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांचा शोध पोलीस घेत असून ते अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. परंतु घेवारे यांच्या वतीने ठाणे न्यायालयात न्यायाधीश आर. आर. काकाणी यांच्या कडे अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जोरदार विरोध केला.

 सुमारे तीन तास चाललेल्या या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी निर्णय बुधवार २३ जून रोजी देण्याचे म्हटले आहे. त्यामुळे २३ जून रोजी घेवारे यांना अटक पूर्व जामीन मिळणार की त्यांचा अर्ज फेटाळला जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी