शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकरला जाणारा घाट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 01:38 IST

वादळी पावसामुळे लोखंडी शिड्या तुटल्या : घाट बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाने काढले आदेश

नेरळ : बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात भक्तांची प्रचंड गर्दी असते. सोमवारी तर लाखोंच्या संख्येने शिवभक्त, भीमाशंकरला ट्रेकिंग करीत जाणारे ट्रेकर्स हे कर्जत तालुक्यातून असलेल्या पायवाटेने जातात. या पायवाटेतील महत्त्वाची आणि ट्रेकर्सला आवडणारी पायवाट म्हणजे शिडी घाट. आव्हानात्मक असलेला हा शिडी घाट यावर्षी बंद झाला आहे. दरम्यान, त्या बाबत रायगड जिल्हा प्रशासनाने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शिडी घाट बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

भीमाशंकरला खांडस मार्गे जाणाऱ्या भाविकांची रीघ लागली आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकरला जाण्याकरिता रेल्वेने नेरळ किंवा कर्जत स्टेशन आणि तेथून कशेळे येथे आल्यानंतर कशेळे येथून दर १५ मिनिटांनी खांडसकडे जाणाºया मिनिडोअरने १४ कि.मी. अंतरावरील काठेवाडी (खांडस) येथून जाण्याकरिता दोन मार्ग आहेत. थोडासा अवघड असणाºया शिडी घाट मार्गे भीमाशंकरला पोहोचता येते. अनेक वर्षांपासून असलेली लाकडी शिडी बदलून त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावल्याने धोकादायक मार्ग थोडा सोपा झाला होता. मात्र, या वर्षी सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयाने शिडी घाटातील त्या लोखंडी शिड्या कोसळल्या आहेत.दगडाचे एक २५ फूट उभे कातळ चढून जावे लागणारा शिडी घाट हा भीमाशंकर अभयारण्य पाहण्यासाठी येणाºया ट्रेकर्सचा आवडीचा मार्ग आहे. आव्हानात्मक असलेल्या या मार्गाने सराईत ट्रेकर्स आपले प्लॅन प्रामुख्याने पावसाळ्यात करीत असतात. मात्र, या वर्षी ट्रेकर्सला शिडी घाटातून भीमाशंकर गाठता येणार नाही. कारण शिडी घाटातील काही प्रमुख शिड्या यांच्यापैकी एक मुख्य शिडी वादळात कोसळली आहे.आम्ही खांडस येथे फलक लावून शिडी घाट बंद असल्याची माहिती देणार आहोत, त्याच वेळी त्या फलकांवर शिडी घाटातील मोडलेल्या लोखंडी शिड्या यांचे फोटो मोठ्या आकारात टाकले आहेत. ते बॅनर अन्य महत्त्वाच्या रस्त्यावरही लावले जाणार आहेत.- वैशाली परदेशी, प्रांत अधिकारी 

टॅग्स :thaneठाणेBhimashankarभीमाशंकर