शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 06:11 IST

Gadkari Rangayatan Thane: गेल्या १० ते ११ महिन्यांपासून ठाण्यातील गडकरी रंगायतनचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतन सुरू झाल्यानंतरच डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे ठाणे महापालिकेने बुधवारी स्पष्ट केले. शहरातील दोन्ही नाट्यगृहे एकाचवेळी बंद झाल्यास ठाणेकर रसिक आणि नाट्यकलावंतांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या १० ते ११ महिन्यांपासून ठाण्यातील गडकरी रंगायतनचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, ठाणेकर रसिक मात्र हे नाट्यगृह सुरू होण्याची वाट पाहत आहेत. त्यासाठी महापालिकेने आतापर्यंत पाचदा वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या. मात्र, अद्याप हे नाट्यगृह बंदच आहे. 

नाट्यगृहातील प्रत्येक काम बारकाईने केले जात असून, ते सुरू झाल्यानंतर कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची दक्षता पालिकेकडून घेतली जात आहे. गेल्या महिन्यात खा. नरेश म्हस्के यांनी या नाट्यगृहाची पाहणी केली होती. त्यावेळी हे नाट्यगृह १५ मेपासून सुरू करण्याचे आश्वासन पालिकेने त्यांना दिले होते; परंतु, जून महिना संपत आला तरी गडकरी रंगायतन सुरू होण्याची लक्षणे दिसत नाहीत. 

‘लोकमत’च्या बातमीची दखल

‘गडकरी’ बंद असतानाच डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या छताला गळती लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे कामही पालिकेने हाती घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी येत्या ७ जुलैपासून हे नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, ठाणे महापालिकेने एक पाऊल मागे घेतले. 

घाणेकर नाट्यगृहाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बुधवारी पालिका मुख्यालयात बोलावण्यात आले होते. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या छताच्या वरील बाजूची गळती बंद करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेने ठेकेदाराला दिल्या आहेत.

जोपर्यंत गडकरी रंगायतन सुरू होत नाही, तोपर्यंत घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू करू नये, असे ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाट्यरसिक आणि नाट्यकलाकारांना दिलासा मिळाला आहे. 

महापालिकेच्या या निर्णयामुळे घाणेकर नाट्यगृहाच्या दुरूस्तीचे काम पुढे ढकलले जाणार असले तरी  पावसाळ्यासाठी येथे तातडीने प्रतिंबधक उपाययोजना कराव्यात अषी मागणी आता नाट्य क्षेत्रातील कलाकारांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेTheatreनाटक