शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जुळवून घ्या, आव्हाडांचा सरनाईक यांना मित्रत्वाचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 07:30 IST

सरनाईक यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या उपवन फेस्टिव्हलच्या स्टेजवर आव्हाड यांनी रविवारी प्रथमच हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 

ठाणे : शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मैत्री गेल्या ३५ वर्षांची आहे. मधल्या काळात उभयतांमधील दुरावा, अबोल्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांच्यातील दुरावा संपला. सरनाईक यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या उपवन फेस्टिव्हलच्या स्टेजवर आव्हाड यांनी रविवारी प्रथमच हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 

यावेळी दोघांनी परस्परांना कोपरखळ्या मारल्या. मात्र, आव्हाड यांनी सरनाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याचा मित्रत्वाचा सल्ला दिला. आव्हाड व सरनाईक यांनी विद्यार्थी संघटनेपासून एकत्र काम केले. मधल्या काळात या दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला होता. 

आव्हाड २० वर्षांनंतर मंत्री होतील आव्हाड आणि मी लहानपणापासून मित्र आहोत. शिवाय आम्ही विद्यार्थी संघटनेत एकत्र काम केले आहे. ते माजी आणि मी आजी मंत्री आहे. तसेच, भविष्यात म्हणजेच १५-२० वर्षांनी आव्हाड हे आजी मंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे सरनाईक म्हणाले.

असा झाला दुरावा सरनाईक यांनी २००८ मध्ये ठाणे पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. येथेच या दोन मित्रांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला. त्यानंतर २०२० पर्यंत त्यांच्यात शत्रुत्व कायम राहिले. २०२० मध्ये वर्तकनगर येथील पोलिस वसाहतीच्या मुद्द्यावरून ते एकत्र आले. मात्र, त्यावेळेस आव्हाड हे मंत्री होते आणि सरनाईक हे आमदार होते. 

तुझे काम असेच प्रगतिपथावर राहो तुझे काम असेच प्रगतिपथावर राहो. तू वेगळ्या पद्धतीने चमकावे एवढीच इच्छा व्यक्त करतो, नाही तर लोक आजकाल चमकतात. भ्रष्टाचार बाहेर येतात. काहीजणांच्या ऑर्डरला स्टे ऑर्डर मिळतात. त्या लफड्यात तू पडू नकोस. तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव. सगळे व्यवस्थित होईल, असा सल्ला आव्हाड यांनी दिला.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे