शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महापालिकांच्या महासभा आता सभागृहात होणार, उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 02:29 IST

High Court : विशेष म्हणजे हा आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश लागू असणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या महासभा या आता प्रत्यक्ष स्वरुपात होणार आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा अखेर प्रत्यक्ष पद्धतीने सभागृहात होण्याचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. यासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीत २३ फेब्रुवारीपासून आदेशाची अंमलबजावणी व्हावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परंतु, ठामपाची फेब्रुवारी महिन्याची महासभा ऑफलाईन होणार असून, पुढील महिन्यापासून ती प्रत्यक्ष सभागृहात होणार आहे. विशेष म्हणजे हा आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश लागू असणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या महासभा या आता प्रत्यक्ष स्वरुपात होणार आहेत.कोरोनाचे संक्रमणाचा वेग आता कमी होत असून, अन्य सर्वच आघाड्यांवरील व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या धर्तीवर महासभा प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केली होती, तर विरोधी पक्षनेते शाणू पठाण यांच्या याचिकेची त्यात भर पडली होती. या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुनावणी झाली. त्यानुसार प्रत्यक्ष महासभा घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शाणू पठाण यांनी दिली.कोरोनासंदर्भातील निर्बंध आणि शिथिलीकरणाचे दिशानिर्देश राज्य शासनाकडून दिले जात आहेत. त्यानुसार या याचिकेवर शासनाला आपली बाजू मांडण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. हे दिशानिर्देश सभा सुरू करण्यास अनुकूल असले आणि न्यायालयाने तशी परवानगी दिली तरी १८ तारखेची सभा ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी लागणार आहे. 

सभा ऑनलाईनच घ्यावी लागणार नियमानुसार सभेबाबतची नोटीस आठ दिवस आधी देणे बंधनकारक आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारीची सभा वेबिनार पद्धतीने घेण्याबाबतची सूचना गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. १५ तारखेच्या आदेशानंतरही ८ दिवसांचा कालावधी मिळत नसल्याने सभा ऑनलाइनच घ्यावी लागेल. ही सभा खंडित किंवा तहकूब झाली तर न्यायालयाच्या आणि सरकारच्या दिशानिर्देशानुसार त्या पुढील सभांचे सभागृहात आयोजन करता येणार आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट