शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

आराेग्य साहित्य तुटवड्यावरून महासभा आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:10 IST

लक्षवेधीतून प्रशासनावर टीका : नियंत्रण समिती स्थापन करण्याचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  शहरात  मनुष्यबळ नसल्याने काेविड सेंटर बंद आहेत. ऑक्सिजन नसल्याने बेड रिकामे आहेत. रेमडेसिविरचा तुटवडा आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या हातावर लावण्यासाठी शाई नाही, वॉरचा कारभार राम भरोसे असून पीपीई किट नसल्याने मृतदेह चक्क प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून देण्याचा प्रकार घडला.  यावरून मंगळवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाविराेधात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नियंत्रण समिती  स्थापण्याचा ठराव  करण्यात आला.मंगळवारी महासभा सुरू होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे आणि भाजपचे नारायण पवार यांनी लक्षवेधी मांडून ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले. विक्रांत चव्हाण यांनी कोविडसाठी निधी देऊनही त्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे तीन वर्षांचे योग्य नियोजन करून निधी उपलब्ध करावा, असे सांगितले.  मनोहर डुंबरे यांनी खासगी रुग्णालयातील मृतदेह एक दिवस उलटूनही उचलले जात नसल्याचा आरोप केला. शिवसेनेचे विकास रेपाळे यांनी कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली. दिव्यात अद्याप कोविड सेंटर नसल्याची खंत बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. वॉर रूमची शिक्षकांवर जबाबदारी द्यावी, अशी मागणी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली. गरीब रुग्णांना ग्लोबलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्याऐवजी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा अजब सल्ला पालिका देत असल्याचा आरोप अनिता गौरी यांनी केला. डॉक्टर रुग्ण दाखल करून घेण्यासाठी घाबरत असून त्यांची मानसिकता बदलण्यात यावी, अशी मागणी मिलिंद पाटणकर यांनी केली. नजीब मुल्ला यांनी  समिती स्थापन करावी, त्यात सर्वपक्षीय नगरसेवक, जिल्हाधिकारी कार्यालयातील  अधिकारी, एफडीएचे काही अधिकारी, पोलीस यांचा समावेश करण्याचा ठराव मांडला.रुग्णसंख्या वाढल्याने ताण वाढलादुस:या लाटेतही महापालिकेने योग्य तयारी केलेली आहे. काही त्रुटी असतील परंतु प्रशासनाचे काम सुरू आहे. या लाटेत बेड उपलब्ध न होणे, रुग्णांना औषधे न मिळाल्याने नगरसेवकांचा संताप वाढला आहे, त्यामुळे नगरसेवकांनी खंत व्यक्त केली. याचा शोध घेणे गरजेचे आहे. रेमडेसिविरसह ऑक्सिजनवरून प्रशासनाला दोषी ठरविणे अयोग्य आहे. राेज रुग्ण वाढत असल्याने बेडदेखील उपलब्ध होत नाही, रुग्णांना रोज अधिकचे ऑक्सिजन लागत असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. ते मिळावे यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत, खाजगी रुग्णालयांनाही महापालिकेने ऑक्सिजनपुरवठा केला आहे. वॉररूमच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न केला आहे. छोट्याछट्या् चुका का? होतात, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.          - नरेश म्हस्के, महापौर - ठामपा

टॅग्स :tmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या