शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तृतीयपंथीय गौरी सावंत यांच्या अनोख्या मातृत्वाची अत्रे कट्टयावर उलगडली कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 17:38 IST

तृतीयपंथीय गौरी सावंत यांच्या अनोख्या मातृत्वाची अत्रे कट्टयावर कहाणी उलगडली.

ठळक मुद्देतृतीयपंथीय गौरी सावंत यांच्या अनोख्या मातृत्वाची अत्रे कट्टयावर उलगडली कहाणीमातृत्व हे फक्त महिलांमध्येच असते असे नाही तर ते प्रत्येकातच असते : गौरी सावंतटाळ््या वाजवणे हा आमचा आक्रोश आहे : गौरी सावंत

ठाणे: तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व एड्स बाधीत वारांगणांच्या मुलांना आधार देणाºया गौरी सावंत यांच्या अनोख्या मातृत्वाची कहाणी बुधवारी अत्रे कट्ट्यावर उलगडण्यात आली. या मुलांसाठी त्यांनी सुरू केलेले नानी का घरचा संघर्षमय प्रवास त्यांनी आपल्या औघवत्या शैलीतून उलगडला. मातृत्व हे फक्त महिलांमध्येच असते असे नाही तर ते प्रत्येकातच असते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.                आम्ही भीक मागत नाही तर भीक्षा मागतो. आपण शाळेत लिंग समानता शिकतो मग आम्हाला अपराधाची वागणूक समाजात का दिली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुमच्याच घरात पुरूष पहिला की स्त्री पहिला यावरुन भांडण असते मग मला थर्ट जेंडर म्हटले तरी चालेल हे सांगताना त्या म्हणाल्या, नानी का घर हे भारतातील पहिले घर आहे. जिथे उतारवयातील तृतीय पंथीय आहे हे वारांगणांच्या एचआयव्ही बाधीत मुलांचा सांभाळ करतात. त्या मुलांनाही आजी आजोबांचे प्रेम मिळते आणि त्यांनाही नातवंडांचे प्रेम मिळते. आम्हाला समाजापासून तुटायचे नाही, आम्हाला समाजातच राहायचे आहे. परंतू आम्ही जसे आहोत तसेच आम्हाला स्वीकारावे इतकीच आमची अपेक्षा आहे. सरकारने ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्ड काढले तर आम्हाला घरे मिळतील आणि नोकºयाही मिळतील. माणूस म्हणून आपण प्रत्येकाचाच आदर केला पाहिजे. अंगणवाडीत तृतीयपंथीयांना नोकºया दिल्यास लहान मुलांच्या मनातली भिती तिथूनच निघून जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले. माझ्या लैंगिकतेचा मला त्रास होत नाही तर तुम्हाला का होतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लैंगिकता ही बांधल्यासारखी नाही, कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही. तुम्ही तृतीयपंथीयांचा बाऊ का करतात. एका स्त्रीला पुरूषासारखे आणि पुरूषाला स्त्री सारखे वागावेसे वाटते म्हणूनच त्याला ट्रान्सजेंडर म्हणतात. यावेळी त्यांनी आर्टीकल ३७७ साठी दिलेल्या लढ्यासंदर्भात सांगितले. माझ्या सारख्या प्रत्येक गौरीला समाजाने स्वीकारावे समाज बदलला तर आम्हीही बदलू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. टाळ््या वाजवणे हा आमचा आक्रोश आहे. पोटासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते ही शोकांतिका आहे. भीक्षा मागू नका असे आम्हाला म्हटले जाते मग पर्याय काय? असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी ज्येष्ठ लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कट्ट्याच्या शीला वागळे यांनी गौरी सावंत आणि कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ. देवदत्त चंदगडकर यांचा सुरेश जांभेकर यांनी सत्कार केला. दरम्यान, चंदगडकर यांनी गौरी सावंत यांच्या नानी का घर याला अर्थसहाय्य केले. संपदा वागळे यांनी परिचय करुन दिला. सुलभा आरोसकर यांनी आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक