शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहापूरच्या पेंढरी गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव; २३ घरांतील नागरिकांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:23 IST

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात वैद्यकीय कॅम्प उभारण्यात आला आहे. या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या मदतीला गांवकऱ्यांसह श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते धावत आहेत.

ठाणे / शहापूर : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पेंढरी गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली आहे. गावातील तब्बल २३ घरांमधील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, अनेक रुग्णांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गावातील दूषित पाणीपुरवठा ही या आजाराला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांना उलटी, जुलाब व अशक्तपणासारख्या लक्षणांचा त्रास जाणवू लागल्याने ही बाब उघड झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात वैद्यकीय कॅम्प उभारण्यात आला आहे. या डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या मदतीला गांवकऱ्यांसह श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते धावत आहेत.

या गावातील काही रुग्णांना अघई प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले, तर काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, शहापूर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे, असे श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश खाेडका यांनी स्पष्ट केले.पाणी उकळून वापरण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना पाणी उकळूनच वापरण्याचे आवाहन केले असून, सध्या संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. 

टॅग्स :Waterपाणीhospitalहॉस्पिटल