शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कचराप्रश्नी केडीएमसीने हात झटकले

By admin | Updated: April 27, 2017 23:50 IST

रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला राथ रोडनजीकच्या मधल्या पादचारी पुलाखालील कचऱ्याला मागील शुक्रवारी आग लागली.

डोंबिवली : रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला राथ रोडनजीकच्या मधल्या पादचारी पुलाखालील कचऱ्याला मागील शुक्रवारी आग लागली. महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांमुळे हा कचरा होतो, अशी टीका रेल्वे अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, ती खोडून काढत तेथे फेरीवाले बसू नये, यासाठी महापालिकेतर्फे नेहमीच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे हा कचरा फेरीवाल्यांनी टाकलेला नसून त्यांचा आगीशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिले आहे. डोंबिवलीतील आगीसंदर्भात घरत यांनी अग्निशमन दल आणि सहायक आरोग्य अधिकारी, ‘ग’ प्रभाग अधिकारी यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागितला होता. त्याआधारे त्यांनी ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.राथ रोडवर बसणारे रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स सामान, फळे, भाजीपाला इत्यादी विक्रेते तसेच पादचारी पुलावरील विक्रेते आग लागली, तेथे कचरा टाकतात, असे स्थानक प्रबंधकांचे म्हणणे आहे. हा कचरा दररोज केडीएमसीच्या ‘ग’ प्रभागामार्फत वाहन पाठवून रेल्वे व महापालिकेच्या समन्वयाने उचलला जातो. स्थानक परिसर व पादचारी पुलावर कचरा होणार नाही, यासाठी फेरीवाल्यांना तेथे मज्जाव केला जातो, असे घरत यांनी म्हटले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार आग लागल्याची माहिती दूरध्वनीवरून महापालिकेच्या एमआयडीसी अग्निशमन केंद्रास मिळाली. घटनास्थळावर अग्निशमन अधिकारी जाताच या आगीवर पाणी मारून ती विझवण्यात आली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, रेल्वे रुळांलगत असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. ती जागा ही रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत येते. आग रेल्वे हद्दीत लागली असली, तरीही तो एवढ्या मोठ्या प्रमाणातील कचरा तेथे आलाच कसा, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. तेथे कचरा आहे, हे कोणाला माहीत होते का? तेथे सीसी कॅमेरे आहेत का, हे मात्र स्पष्ट केलेले नाही. (प्रतिनिधी)