शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मीरा-भाईंदर महापालिकेचा कचऱ्याचा डोंगर पेटला

By धीरज परब | Updated: February 18, 2023 23:08 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंगमध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी रात्री भीषण आग लागली.

मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंगमध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी रात्री भीषण आग लागली. महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे प्रक्रिया न करताच अनेक वर्ष टाकलेल्या कचऱ्याचे तेथे डोंगर निर्माण झाले आहेत. सदर डोंगरास सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास कचऱ्याच्या डोंगरास भीषण आग लागली. 

रात्रीच्या वेळी लागलेल्या ह्या भीषण आगीमुळे डोंगर पेटल्याच्या ज्वाळा थरकाप उडवणाऱ्या होत्या. अगदी भाईंदरवरून देखील आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. त्यातच वाऱ्याने आग आणखी भडकली. शिवाय कचऱ्याच्या डोंगरातील पेटते प्लास्टिक आजूबाजूला उडू लागल्याने काही झुडपात देखील आग लागली. 

आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उसळले आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध अग्निशमन केंद्रातील जवान अग्निशामक यंत्र व टॅंकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.  परंतु आग आटोक्यात येत नसल्याचे व इतकी भीषण आग पहिल्यांदाच लागलेली असून ती विझवण्यास दिवस जातील असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

कचऱ्याच्या घातक धुराचे साम्राज्य आजूबाजूच्या नागरी वस्तीमध्ये पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास देखील त्रास जाणवत होता. कचऱ्याच्या डोंगरावर शास्त्रोक्त प्रक्रिया वेळीच पालिकेने केली नसल्याने ह्याठिकाणी सातत्याने आगी लागत आहेत. तर कचरा नष्ट करण्यासाठी आगी लावल्या जात असल्याचा आरोप लोक करत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfireआग