शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधून १२.५0 लाखांचा गांजा हस्तगत, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:03 IST

गांजाची खरेदी-विक्री करणार्‍या तीन आरोपींना ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी अंबरनाथजवळ अटक केली.

ठळक मुद्देठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई८३ किलो ग्रॅम गांजा हस्तगतआरोपींना १२ दिवसांची कोठडी

ठाणे : गांजा खरेदी-विक्रीसाठी आलेल्या तिघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी अंबरनाथ येथून अटक केली. त्यांच्याजवळून जवळपास १२ लाख ५0 हजार रुपयांचा ८३ किलो ग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत केला.अंबरनाथजवळच्या भालगाव येथे दोन आरोपी गांजा विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना रविवारी मिळाली. त्यानुसार संजय गोडसे आणि पोलीस उपनिरीक्षक धर्मराज बांगर यांच्या पथकाने भालगाव येथे सापळा रचला. त्यावेळी एका कारने दोन आरोपी तिथे गांजा विकण्यासाठी आले. त्यानंतर आणखी एक आरोपी गांजा विकत घेण्यासाठी आला. त्यांच्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये ८३ किलो ५५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. गांजा विकण्यासाठी आलेल्या आरोपींमध्ये भिवंडी तालुक्यातील पडघा येथील अनिल सुरेश पवार (२९) आणि भिवंडी तालुक्यातील कुकसा येथील प्रेमनाथ जगन्नाथ भोईर (२८) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून गांजा विकत घेणाºयाचे नाव दिवेश दुर्वा वायले असून, तो अंबरनाथ तालुक्यातील भालगावचा रहिवासी आहे. गांजाची किंमत १२ लाख ५३ हजार २५0 रुपये असून, आरोपींची कारही पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे हे करीत आहेत. आरोपींना न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पडघा येथील अनिल पवार हा गांजा विक्रीचे गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काही दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी पथक त्याच्यावर पाळत ठेऊन होते. रविवारी ठोस माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमि तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती संजय गोडसे यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस