शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

हातगाडीवाल्याना खंडणीसाठी मारहाण, धमक्या व महिलेचा विनयभंग करणाऱ्या गुंडास अखेर बेड्या ठोकल्या

By धीरज परब | Updated: April 7, 2024 21:48 IST

भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट भागात वर्धमान इमारती जवळ अमिनाबीबी शेख हि महिला अंडापावची गाडी लावते .

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट परिसरात हातगाडी वाल्यां कडून खंडणी उकळणाऱ्या व खंडणी न दिल्यास मारहाण , तोडफोड करून धमकावणाऱ्या , विक्रेत्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या संदेलकुमार उर्फ पालनाथ नाडर ( ३८ )  ह्या गुंडास अखेर नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट भागात वर्धमान इमारती जवळ अमिनाबीबी शेख हि महिला अंडापावची गाडी लावते . लारा याने तिच्या कडे २ हजार रुपये मागितले असता तिने नकार दिला . त्याचा राग येऊन लारा याने तिला अश्लील शिवीगाळ करत रस्त्यावर तुझे कपडे काढून बलात्कार करेन असे धमकावत तिला मारहाण करत बळजबरीने ओढून रस्त्यात नेले . तिच्या कमरे जवळील कुर्ता फाडला अश्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी लारा ह्याला ५ एप्रिल रोजी रात्री अटक केली आहे . 

वास्तविक अमीन शेख सोबत झालेल्या घटने नंतर  प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाच्या मीरा भाईंदर महिला अध्यक्ष काजल नाईक सह दिव्यांगांनी व महिलांनी संताप व्यक्त करत लारा याला तात्काळ अटक करण्याची मागणी चालवली होती . लारा नाडर हा न्यू गोल्डन नेस्ट - इंद्रलोक परिसरात हातगाडी - बाकडे लावणाऱ्यां कडून हप्ता गोळा करतो . हप्ता दिला नाही तर मारहाण , धमकावणे , तोडफोड असे प्रकार करतो . या भागात त्याला विचारल्या शिवाय कोणाला गाडी - बाकडं लावता येत नाही . तो स्वतः हप्ता घेऊन बाकडे - हातगाड्या लावत असल्याचा आरोप येथील प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाच्या मीरा भाईंदर महिला अध्यक्ष काजल नाईक यांनी चालवला होता . 

जानेवारी महिन्यात देखील लारा याने क्रीडा संकुल जवळ चहाचा स्टॉल लावणाऱ्या जिलाजीत यादव व त्यांचा भाचा संदीप याला हप्ता दिला नाही म्हणून मारहाण केली . नाडर याने चहा घोटण्याच्या वस्तूने संदीपचे डोके फोडले व शिवीगाळ करत धमकी दिली .  या प्रकरणी नवघर पोलिसांनी २९ जानेवारी रोजी यादव यांच्या फिर्यादी वरून लारा वर गुन्हा दाखल केला होता . विशेष म्हणजे यादव यांच्या फिर्यादीत अमीना शेख हिच्या कडे नाडर हा २ हजारांचा महिना घेत होता . तिने पैसे नसल्याचे सांगितल्या वरून तिच्या गाडीवरील अंडी फोडून तिला शिवीगाळ , धमकी दिली होती  हे सुद्धा नमूद होते . 

परंतु नवघर पोलिसांनी लारा विरुद्ध ठोस आणि कठोर कारवाई न केल्याने पुन्हा त्याने अमीना यांच्यावर हल्ला केल्याचा संताप व्यक्त होत आहे . याच लारा याने एका दिव्यांग तरुणीला स्टॉल बांधण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन फसवले त्या बद्दल मार्च महिन्यातच नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता .