शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ठाण्याच्या व्यापाऱ्याला खंडणीसाठी रवी पुजारीकडून अशी आली धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:00 IST

एक करोड दे नाही तर तुला दिवाळीचा बोनस देईन,’ अशा भाषेतच कळव्यातील एका व्यापाºयाला गँगस्टर रवी पूजारीच्या नावाने धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

ठळक मुद्दे ‘एक करोड दे नाहीतर दिवाळीचा बोनस देईल’कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखलगुन्हे अन्वेषण विभागही करणार तपास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘कळव्यामध्ये तुझे गॅलेक्सीचे आॅफीस आहे, तू कोठे राहतोस, हे माहित आहे. एक करोड दे नाही तर तुला दिवाळीचा बोनस देईन,’ असे सुनावून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणारा फोन गँगस्टर रवी पूजारीच्या नावाने कळव्यातील एका व्यापा-याला करण्यात आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्टॉक मार्केटमध्ये सब ब्रोकरचे काम करणारी या व्यापाºयाची एजन्सी आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेअर बाजारातून शेअर्स घेऊन त्याची विक्री करण्याचा व्यवसाय तो करतो. सुरुवातीला ६ नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे ३ च्या सुमारास बाहेरील देशातून त्याच्या मोबाइलवर फोन आला. पहाटेची वेळ असल्यामुळे त्याने तो घेतला नाही. पण पुन्हा त्याच दिवशी सकाळी ११.२४ वाजण्याच्या सुमारास फोन आला. समोरील व्यक्तीने या व्यापाºयाच्या नावाची खात्री केली. नंतर आपण रवी पुजारी बोलत असल्याचे सांगून कळव्यात तुझे गॅलेक्सीचे कार्यालय आहे. तू कोठे राहतोस हेही माहीत आहे. एक करोड दे नाहीतर दिवाळीचा बोनस देईल, असे बोलून त्याने फोन कट केला. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी पहाटे तसेच पुन्हा रात्री ९ च्या सुमारासही फोन करून धमकावून समोरील व्यक्तीने पैशांची आठवण केली. त्यानंतरही ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.५४ वाजेनंतर वारंवार फोन आले. भीतीने त्यांनी तो घेतला नाही. त्यानंतर मात्र आलेल्या फोनवर या व्यापाºयाने ही रक्कम मोठी असून इतकी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. तेंव्हा गाडी, सदनिका बुकिंगची माहिती देऊन त्याने पैसे देणार नसशील तर मुले पाठवू का तुझ्या आॅफीसला? असे सांगून पुन्हा एक कोटीची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिली. वारंवार येणाºया धमक्यांना कंटाळून या व्यापाºयाने अखेर कळवा पोलीस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी तक्रार केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही याप्रकरणी समांतर तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.-----------------

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी