शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी व वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद: १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 22:41 IST

नियोजनबद्ध गस्त आणि नाकेबंदी सुरु असतांना एका रिक्षातून सराईत चोरटयांची टोळीच पोलिसांनी पकडली. त्यांच्याकडून ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन रिक्षा, साडे तीन लाखांच्या पाच मोटारसायकली, चार मोबाइल आणि दहा हजारांची रोकड असा १६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२० गुन्हयांची उकलकळवा पोलिसांची कामगिरीगस्तीदरम्यान मिळाली सराईत गुन्हेगारांची टोळी

ठाणे: रेल्वे स्थानक परिसरातील घरांची टेहळणी करुन घरफोडी आणि वाहनांची चोरी करणाऱ्या युसूफ शेख (२६, रा. शांती मफतलाल झोपडपट्टी, ठाणे ) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कळवा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून घरफोडीचे १३ तर वाहन चोरीचे सात असे २० गुन्हे उघड झाले असून १६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिसांची नियोजनबद्ध गस्त आणि नाकेबंदी सुरु असतांना एका रिक्षात काही संशयित वावरतांना आढळून आले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची बाब उघड झाली. यामध्ये युसूफ शेख याच्यासह पंकज मोर्या (३२, रा.सायन मुंबई ), आकाश घाडगे (२४, रा.दिघा) आकाश विश्वकर्मा (१९, रा.दिघा) आणि सुभाष यादव (२२, रा.वाघोबानगर,कळवा) या पाच आरोपींचा समावेश होता. त्यांच्याकडून कळव्यातील घरफोडीचे ११ गुन्हे, वाहन चोरीचे तीन, मुंब्रा येथील घरफोडीचे दोन तर नौपाडयातील वाहन चोरीचे दोन आणि नारपोलीतील वाहन चोरीचा एक अशा २० गुन्ह्यातील सुमारे साडे सोळा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आल्याची माहिती कुंभारे यांनी दिली.कळवा पोलीस ठाण्याच्या परिसरात गेले काही दिवस घरफोडी व वाहनचोरीच्या घडत असल्याने पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली होती. तेव्हा वाहनांची तपासणीमध्ये या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर ही टोळी पोलिसांच्या हाताला लागली. हे सर्व सराईत गुन्हेगार असून ते रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या घरांमध्ये चो-या करीत होते. त्यांच्याकडून ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन रिक्षा, साडे तीन लाखांच्या पाच मोटारसायकली, चार मोबाइल आणि दहा हजारांची रोकड असा १६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी