शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भिवंडीत अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला अटक, नारपोली पोलिसांची कारवाई

By नितीन पंडित | Updated: December 28, 2023 19:42 IST

भिवंडी : मानकोली परिसरात असलेल्या प्रभात केबल प्रा.लि.च्या गोदामावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या १३ जणांच्या टोळीतील आरोपींनी तेथील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा ...

भिवंडी: मानकोली परिसरात असलेल्या प्रभात केबल प्रा.लि.च्या गोदामावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या १३ जणांच्या टोळीतील आरोपींनी तेथील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन मोबाईल असा मुद्देमाल चोरी केला होता.नारपोली पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत एकूण नऊ दरोडेखोरांना अटक केली आहे.यातील तीन आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.हे सर्व आरोपी गोवंडी मुंबई परिसरातील असून मुंबई,ठाणे,रायगड या परिसरात त्यांनी दरोड्याचे गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

१३ डिसेंबर रोजी तेरा जणांच्या टोळीने मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी गोदामाच्या  मुख्य गेटला शिडी लावून गोदाम परिसरात गेले असता त्याठिकाणी त्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला असता त्यांनी तेथील कामगारांना हत्यारांचा धाक दाखवून सोन्याची चैन, रोख रक्कम चोरी केली होती.या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे,पोलिस उपनिरीक्षक रोहन शेलार, डी डी पाटील,व पोलिस पथकातील पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच अवघ्या सहा तासात मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इशान अब्दुल रहेमान शेख,शहबाज मोहम्मद सलीम शेख अशा दोघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या जवळ कसून चौकशी करीत अहमद हुसेन सत्तार सावत उर्फ सलीम,वजीर मोहम्मद हुसेन सावत उर्फ कान्या,रेहान कब्बन सैय्यद, गुलामअली लालमोहम्मद खान,हसन मेहंदी शेख,सलीम फत्तेमोहम्मद अन्सारी उर्फ सलीम हाकला,प्रमोदकुमार बन्सबहादुर सिंग यांना मुंबई आयुक्तालयातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेवून एकूण नऊ जणांना अटक केली आहे.अटक केलेले सर्व आरोपी हे सराईत दरोडेखोर असून त्यांच्या विरोधात मुंबई,वसई,रायगड,पुणे या विविध ठिकाणी १४ दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे तर तीन जणांविरोधात पुणे पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रोहन शेलार हे करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी