शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी ठाण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:02 IST

खून, खूनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल चोरटयांनी ठाण्यातील एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पर्वतसिंग चुडावत या अट्टल गुन्हेगारासह तिघा जणांच्या टोळक्याला शुक्रवारी (४ आॅक्टोंबर) अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई अवघ्या ३६ तासांमध्ये अट्टल चोरटयांना अटकराजस्थानासह ठाणे मुंबईत अनेक गुन्हे दाखल

ठाणे : घोडबंदर रोडवरील बँकेचे एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्वतसिंग चुंडावत (४३) याच्यासह तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने अवघ्या ३६ तासांमध्ये जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शनिवारी दिली. या सर्व आरोपींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर रोडवरील लॉकीम कंपनीसमोरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना १ आॅक्टोबर २०१९ रोजी पहाटे ४.१२ ते ४.३९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. एटीएम केंद्राचे शटर आतून बंद करून गॅसकटरच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करून कॅश डिपॉझिट मशीन कापून मोठे नुकसान केले. सुदैवाने त्यांना यातील रोकड लुटता आली नाही. याच परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये दोघेजण चोरटे आढळून आले होते. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कापूरबावडी पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही यातील आरोपींचा शोध घेत होते. यातील एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणारी टोळी बाळकुम परिसरात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे यांना मिळाली. ही माहिती तसेच सीसीटीव्हीतील चित्रण आणि सुमारे १० ते २० हजार मोबाइल विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपींचा माग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, उपनिरीक्षक प्रदीप भोईर, पोलीस कॉन्स्टेबल शेजवळ आणि अदिती तांबे आदींच्या पथकाने काढला. ठाण्यातील बाळकुम, साकेत रोड परिसरात सापळा लावून पर्वतसिंग चुंडावत (रा. मनोरमानगर, मूळ रा. राजसमंद, राजस्थान), राजसिंग ठाकूर (३५, रा. इंदिरानगर, मूळ रा. उत्तरांचल) आणि अमोल संपत यादव ऊर्फ अमोल सोमनाथ शुक्ला (३०, रा. इंदिरानगर, ठाणे, मूळ रा. सातारा) या तिघांनाही या पथकाने अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी एटीएम फोडून त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.हे तिघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर राजस्थान, मुंबई तसेच ठाण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.कुख्यात गँगस्टरचा खूनआरोपींपैकी राजसिंग ठाकूर हा दहिसर येथील एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातून एक वर्षापूर्वीच जामिनावर सुटलेला आहे. त्याने संदीप शेट्टी या गँगस्टरचाही २०१५ मध्ये अंबरनाथमध्ये खून केला होता. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, मुंबई, एमएचबी, मीरा रोड, ठाणे ग्रामीण, भांडुप, दहिसर, राजस्थानमधील अमेठ आदी पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध सात ते आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.* लाखोंच्या विम्यासाठी स्वत:च्या खुनाचा बनावआरोपींमधील पर्वतसिंग याने ५० ते ६० लाखांच्या विम्यातील पैसे मिळविण्यासाठी स्वत:च्याच खुनाचा बनाव केला होता. त्याने त्याच्यासारख्याच शरीरयष्टीच्या एका अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याच्याजवळ स्वत:चे ओळखपत्र ठेवले. त्याच्या कुटुंबीयांनी राजस्थानमध्ये त्याचा अंत्यविधीही केला. त्यानंतर, ठाण्यात दीड वर्षापूर्वी एका गुन्ह्यात पकडल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्याला समोर दाखवल्यानंतर त्याचा बनाव उघड झाला होता. या प्रकरणात तो जामिनावर सुटला होता. त्याआधी २००९ मध्येही पैशांसाठी आपल्याच भावाचा त्याने खून केला होता. त्याही गुन्ह्यात त्याची जामिनावर सुटका झाली होती. तर, तिसरा आरोपी अमोल हा रिक्षाचालक असून त्याने सिलिंडर आणि गॅसकटरच्या वाहतुकीसाठी रिक्षाचा वापर केला. तसेच गुन्ह्याच्या वेळी तो टेहळणीचे काम करीत होता. त्याची रिक्षा आणि गॅसकटरही पोलिसांनी जप्त केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी