शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

उत्तराखंडमधून येऊन वयोवृद्धांना लुटणाऱ्या टोळीला अटक 

By धीरज परब | Updated: February 7, 2025 19:27 IST

सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - उतरराखंड राज्यातून येऊन ट्रेनने येऊन भाईंदर सह मुंबई परिसरात पादचारी वृद्धांना लुबाडणाऱ्या चौकडीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने गुजरातच्या गांधी नगर रेल्वे स्थानकातून रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने अटक केली आहे . त्यांनी केलेले ५ गुन्हे उघडकीस आले आहेत . 

भाईंदर पूर्वेच्या काशीनगर येथे राहणाऱ्या दिनाक्षी पाटील ( वय ५० वर्षे ) या घरी जात असताना काशीनगर येथे त्यांना बोलण्यात गुंतवण दिशाभूल करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व कानातील सोन्याची फुले असे दागिने लांबवणाऱ्या अनोळखी आरोपींवर २ फेब्रुवारी रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर प्रकरणाचा तपास मीरा भाईंदर - वसई विरार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे , सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय सरक, प्रशांत गांगुर्डे व नितीन केंद्रे सह श्रीमंत जेधे , मनोहर तावरे ,आसिफ मुल्ला, संतोष मदने, शिवाजी पाटील, विजय गायकवाड , रवींद्र भालेराव , गोविंद केंद्रे , विकास राजपूत  अन्य पोलीस यांच्या पथकाने चालवला होता . 

सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले.  माहिती व तांत्रिक विश्लेषणात आरोपी हे गुन्हा केल्यानंतर रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यांनी गुजराच्या गांधी नगर रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाचे  सहायक पोलीस आयुक्त संजय चौधरी, वरिष्ठ निरीक्षक सुनील सिंग,  हवा. मोगल आदींच्या मदतीने ४ आरोपीना ताब्यात घेतले . 

आयुब कलूवा हसन ( वय २६ वर्षे ) , फारूकअली लोहरी शाह ( ३४ वर्षे ) , नौशाद अलीमुद्दीन हसन (वय २८ )  व  जलालुद्दीन लोहरी शाह ( वय ४५ वर्षे ) अशी अटक आरोपींची नावे असून हे सर्व उत्तराखंडच्या उधमसिंह नगर भागातील राहणारे आहेत. आरोपींकडून १७ तोळे वजनाचे १४ लाख २३ हजार किमतीचे सोन्याचे दागिने, गुन्हा करताना वापरलेल्या १  लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, २७ हजार किमतीचे चार मोबाईल, रोख  असा एकूण १५  लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . 

सदर आरोपींनी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यासह मुलुंड, टिळक नगर , कांदिवली व घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीत देखील असे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी