शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सराईत सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:45 IST

ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मीरा भार्इंदर आणि शहापूर भागातून अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळीसह मोटारसायकल चोरीचे २७ गुन्हे उघड झाले आहेत.

ठळक मुद्देठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई२७ गुन्ह्यांची उकल २० लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मीरा-भार्इंदर आणि शहापूर भागात जबरीने सोनसाखळी चोरणा-या टोळीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीकडून सोनसाखळीचोरीच्या २३ आणि मोटारसायकलचोरीच्या चार अशा २७ गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे २० लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ठाणे ग्रामीणच्या मीरा-भार्इंदर, मुरबाड, गणेशपुरी आणि शहापूर परिसरात दिवसा आणि रात्रीही सोनसाखळीचोरीचे प्रमाण अलीकडे वाढले होते. त्याअनुषंगाने हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शहापूर, मीरा-भार्इंदर आणि गणेशपुरी विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके गठीत करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने केलेल्या तपासामध्ये मीरा-भार्इंदर भागातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकलवरून आलेले दोघे सोनसाखळी हिसकावून पळून जात असल्याचे आढळले. यातील एक आरोपी परशुराम सॅलियन (३२, रा. नारंगी रोड, विरार) असल्याचे पोलीस रेकॉर्डवरून उघड झाले. त्यानुसार, सॅलियन आणि त्याचा साथीदार आनंदकुमार ऊर्फ सोनू सिंह (२८, पूनमनगर, अंधेरी) यांना २८ सप्टेंबर २०१८ रोजी अटक केली. त्यांनी नयानगर ५, मीरा रोड ३, काशिमीरा ९ आणि भार्इंदर १ अशा १८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १३ लाख तीन हजार ५०० रुपये किमतीचे ४४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि जबरी चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा १३ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांना ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या दोघांनी १२ पुरुषांच्या सोनसाखळ्यांसह आठ महिलांची मंगळसूत्रे हिसकावली. रात्री ९ ते ११ या दरम्यान टी-शर्ट परिधान केलेले पुरुष आणि भाजी घेण्यासाठी बाहेर पडणाºया महिलांना ही जोडगोळी लक्ष्य करत होती.शहापूर, भिवंडी परिसरांतून महिलांची मंगळसूत्रे हिसकावणाºया गुंजल सांडे (२१), गोविंद ऊर्फ पप्या धमके (२१) आणि विजलय सातपुते (२५) या तिघांना सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच सोनसाखळी, तर चार मोटारसायकलचोरीचे असे नऊ गुन्हे उघड झाले आहेत. या त्रिकुटाकडून १९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पाच मोटारसायकली असा सात लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. त्यांना ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरी