शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धंदेवाईक जामीनदारांची टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:43 IST

धंदेवाईक जामीनदार न्यायालयासमोर उभे करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या सहा आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटने अटक केली.

ठाणे : धंदेवाईक जामीनदार न्यायालयासमोर उभे करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या सहा आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटने अटक केली. जवळपास १५० आरोपींना बोगस जामीन मिळवून देणा-या या टोळीकडून बनावट कागदपत्रांसह रबरी शिक्क्यांचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला.धंदेवाईक जामीनदारांच्या टोळीची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटला ३० जुलै रोजी मिळाली होती. त्यानुसार, कल्याण न्यायालय परिसरातून तीन आरोपींना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले होते. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींच्या आणखीतीन साथीदारांची माहिती मिळाली. त्यानुसार, एकूण सहा आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. आरोपींकडून बनावट ४५ रबरी शिक्के, ५१ बोगस शिधापत्रिका, ग्रामपंचायतीचा कर भरल्याच्या ३१८ पावत्या, काही बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली. या टोळीच्या सूत्रधाराने साथीदारांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाच्या बनावट शिधापत्रिका तयार केल्या. त्यानंतर, ग्रामसेवकाच्या सही, शिक्क्यानिशी ग्रामपंचायतीचा कर भरल्याच्या पावत्या तयार केल्या. या बनावट कागदपत्रांच्या आधारे धंदेवाईक जामीनदारास न्यायालयासमोर उभे करून त्याने अनेक प्रकरणांमधील आरोपींना जामीन मिळवून दिला. टोळीच्या सूत्रधाराने बनावट शिधापत्रिका बनविण्यासाठी भिवंडी येथील एका झेरॉक्स सेंटरची मदत घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.ग्रामपंचायतीच्या करपावत्या त्याने उल्हासनगरातील एका प्रिंटिंग प्रेसमधून छापून घेतल्याची माहितीही पोलिसांनी दिली. आरोपींनी बनावट शिक्के सोलापूर येथून बनवून घेतले होते. जवळपास वर्षभरापासून आरोपींचा हा गोरखधंदा सुरू आहे. पोलीस निरीक्षक मनोहर पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.>बोगस जामीन मिळवलेल्या आरोपींचीही चौकशीधंदेवाईक जामीनदारांच्या टोळीने आतापर्यंत १२५ ते १५० आरोपींना बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून दिल्याची पोलिसांची माहिती आहे. कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे न्यायालयात आरोपींनी हे गुन्हे केले आहेत.त्यांनी आतापर्यंत ज्यांना-ज्यांना जामीन मिळवून दिला, त्या सर्व आरोपींचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींच्या चौकशीतून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.>आरोपींची नावे उघड करण्यास पोलिसांचा नकारन्यायालयातून आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे लागायची. ती सर्व बनावट कागदपत्रे या टोळीने तयार केली. काही प्रकरणांमध्ये त्यांनी बनावट आधार कार्डदेखील तयार केले. या कामासाठी त्यांना कुणाची मदत मिळाली, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असल्याने आरोपींची नावे उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला.

 

टॅग्स :Arrestअटक