शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

संशयास्पद व्यक्तींवर गणेश मंडळांनी करडी नजर ठेवावी: विवेक फणसळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:02 IST

गणेशोत्सव साजरा करतांना उत्सवाला कोणतेही गालबोट लावू नका. आवाजाची मर्यादा पाळा. संशयास्पद व्यक्ती आणि हालचालींवर गणेश मंडळांनी विशेष लक्ष देऊन मोठया उत्सहाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देठाण्यातील ३९ सार्वजनिक गणेश मंडळांना मिळाला ‘विघ्नहर्ता पुरस्कार’ ध्वनीप्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा न करण्याचे आवाहन ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये झाला पुरस्कार वितरण सोहळा

ठाणे: सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना ध्वनीप्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा होऊ नये. तसेच संशयास्पद व्यक्ती आणि हालचालींवर गणेश मंडळांनी विशेष लक्ष देऊन मोठया उत्सहाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंगळवारी केले.येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये २७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या दरम्यान २०१८ मधील शिस्तबद्ध तसेच ध्वनी प्रदुषणविरहित पार पडलेल्या गणेशोत्सव मंडळांसाठी ‘श्री विघ्नहर्ता पुरस्कार’ ठाणे शहर आणि वागळे इस्टेट परिमंडळातील ३९ मंडळांना प्रथम, द्वीतीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन फणसळकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.गेल्या वर्षी ठाण्यात कोणतेही गालबोट न लागता गणेशोत्सव साजरा झाला. यावर्षी मोहरम आणि गणेशोत्सव एकत्रित आले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोणतेही गालबोट न लागता उत्साहाने हा सण साजरा करा. प्रत्येक मंडळांसाठी नोडल अधिकारी म्हणून संबंधित पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती केली आहे. या कॉन्स्टेबलवर चार ते पाच मंडळांची जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे कोणतीही समस्या असल्यास मंडळांनी या नोडल अधिकाऱ्याशी समन्वय ठेवून आपल्या अडचणी मार्गी लावाव्यात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ध्वनीप्रदूषण, जमावबंदी आणि वाहतूकीला अडथळा होणार नाही, याचे काटेकोरपणे पालन केले जावे. आवाज आणि वेळेची मर्यादा पाळली जावी. कोल्हापूर, सांगली पटटयातील पूरग्रस्तांसाठी गणेशोत्सव मंडळांनी शक्य होईल तितकी मदत करावी, असे आवाहनही फणसळकर यांनी यावेळी केले.चौकटमुंबई आणि नवी मुंबईपासून ठाणे शहर हे जवळचे शहर आहे. त्यामुळे मंडळांनी संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, अशा सूचनाही त्यांनी मंडळांना यावेळी केल्या. समाजमाध्यमांवर अफवा पसरविण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे सण-उत्सवांच्या कालावधीत एखादा अफवा पसरविणारा संदेश मोबाईलवर आल्यास तात्काळ त्याची पोलिसांना माहिती द्याावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले...............................या मंडळांनी मिळविला विघ्नहर्ता पुरस्कारठाणे शहरातील पोलीस मुख्यालय, जिज्ञासा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, जय भवानी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नमस्कार मित्र मंडळ, कळवा, श्री गणेश मित्र मंडळ, आनंद कोळीवाडा, मुंब्रा, सार्वजनिक गणेशोत्सव ग्रामस्थ मंडळ, भंडार्ली, निर्मल जीवन सोसायटी, कोपरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जय भवानीनगर, गणेश क्रीडा मंडळ, किसननगर, ठाणे, शिवाईनगर सार्व. गणेशोत्सव मंडळ, दत्तगुरु मित्र मंडळ, मानपाडा, श्री गणेश सार्वजनिक उत्सव मंडळ, कासारवडवली आणि प्रताप को. आॅप. हौसिंग सोसायटी, धर्मवीर नगर आदी १३ मंडळांनी प्रथम पारितोषिक पटकविले. तर उर्वरित २६ मंडळांनी अनुक्रमे द्वीतीय आणि तृतीय पारितोषिक मिळविले............................

टॅग्स :thaneठाणेGanesh Mahotsavगणेश महोत्सवPoliceपोलिस