शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घंटाळी मैदानात सुरु आहे भ्रष्टाचाराचा खेळ, भाजपाने पकडले शिवसेनेला कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:51 IST

घंटाळी मैदानाच्या मुद्यावरुन गुरुवारी झालेल्या महासभेत भाजपाने शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले. शिवसेनेच्या एका जेष्ठ माजी नगरसेवकाला हे मैदान आंदन देण्यात आले असून संबधींताबरोबर कोणत्याही प्रकारचा करार न झाल्याने पालिकेचे नुकसान होत असल्याची बाब यावेळी उपस्थित करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेनेचा तो जेष्ठ माजी नगरसेवक कोणठेकेदाराने थकविले पालिकेचे भाडे

ठाणे - ठाणे महापालिकेच्या मालकीचे असलेल्या घंटाळी मैदानात भरगच्च कार्यक्रम होत असतात. परंतु त्यातून पालिकेला कोणत्याही स्वरुपाचे भाडेच मिळत नसल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी उपस्थित केला. तर या मैदानाच्या बाबतीत निविदा काढली असून संबधीत ठेकेदाराबरोबर कोणत्याही प्रकारचा करारच केला नसल्याची गंभीर बाब उघडकीस करीत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. परंतु हे मैदान शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाला आंदन दिल्याची चर्चा सुरु असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपा आक्रमक झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांनी मागणी लावून धरली. त्यामुळे भाजपाने एक प्रकारे शिवसेनेला कोंडीत धरल्याचे दिसून आले.                   गुरुवारी झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या निमित्ताने जोशी यांनी घंटाळी मैदानाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. या मैदानाची निविदा काढली गेली आहे, परंतु भाडेकरार अथवा कोणत्याही प्रकारचा करार न झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यामुळे पालिकेची वास्तु संबधींत ठेकेदाराला आंदन दिली आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाच्या मंडळींनी यामध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसतांना शिवसेनेच्या मंडळींनी मात्र हे प्रकरण आपल्या अंगावर खेचून घेतले. हा मुद्दा महापौरांच्या दालनात सोडविला जावा अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली. त्यावरुन भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात शिवसेनेच्या एका जेष्ठ माजी नगरसेवकाच्या माध्यमातून सध्या हे मैदान सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याच्यासोबत कोणत्याही स्वरुपाचा करार करण्यात आलेला नाही. ही गंभीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लावून धरत भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा