शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील गडकरी रंगायतन २५ डिसेंबर पर्यंत राहणार बंद, सर्व प्रयोग रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 18:07 IST

ठाण्यातील गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु या दुरुस्तीला काही दिवस जाणार असल्याने २५ डिसेंबर पर्यंतचे सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदुरुस्तीचे काम शनिवार पासून सुरुदुरुस्तीला जाणार १५ दिवसांचा कालावधी

ठाणे - ठाण्यातील महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. त्यानंतर आता याच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार २५ डिसेंबर पर्यंत असलेले सर्व प्रयोग रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.             गडकरी रंगायतनमधील खालील बाजूला असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा काही भाग पडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाचा पर्यावरण चित्रपट महोत्सव सुरु होता. यावेळी ७०० विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. परंतु या घटनेनंतर गडकरी रंगायतनचा तांत्रिक अहवाल तयार करण्यात येत होता. त्यानुसार आता हा अहवाल जवळ जवळ प्राप्त झाला असून येत्या २५ डिसेंबर पर्यंत गडकरी रंगायतन बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आतील छताच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. दुरुस्तीसाठी आतील बाजूस परांची देखील बसविण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार आता २५ डिसेंबर पर्यंतचे सर्वच प्रयोग रद्द करण्याच्या सुचना महापालिकेने गडकरी रंगायतन प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता नाट्यप्रेमींची चांगलीच निराशा होणार आहे. गडकरी रंगायतनमध्ये रोज साधारणपणे २ प्रयोग होत असून येथे ९६२ ची आसन क्षमता आहे. तर गडकरीचे वार्षिक उत्पन्न हे सुमारे सव्वा कोटींच्या आसपास आहे. त्यानुसार फारसे नुकसान होणार नसले तरी वेळेत दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा नाट्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त