ठाणे : गदिमा - पुल - बाबुजी या त्रिमुतींच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘त्रिमूर्तींची आठवण - साठवण’ या शब्द सूरांच्या मैफिलीतून त्यांची स्मरणयात्रा महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सादर केली जाणार आहे. या वर्षी या तिघांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे करताना ठाण्याच्या स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर प्रतिष्ठानने हा एक आगळा वेगळा संकल्प केला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आपल्या अलौकिक प्रतिभेने आणि सर्जनशीलतेने शब्द-सूर-संगीताची कधीही न मिटणारी भर घालणारी त्रिमूर्ती म्हणजे गदिमा - पुल - बाबुजी. या तीन दिग्गजांची स्मरणयात्रा महाराष्ट्रभर सादर करण्याचा मानस सावरकर प्रतिष्ठानने केला आहे. महाराष्ट्रात किमान २५ कार्यक्र म जन्मशताब्दी वर्षात सादर केले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष केदार बापट यांनी दिली. या कार्यक्र मात निवेदक विघ्नेश जोशी आणि मकरंद जोशी यांचा सहभाग आहे. पु ल , गदिमा, बाबुजींचे अनेक किस्से, आठवणी, प्रसंग याचा आस्वाद जसा रसिकांना घेता येईल त्याच प्रमाणे अवधूत रेगे, रवींद्र साठे, कल्याणी जोशी, मानसी फडके, धनंजय म्हस्के यांनी सादर केलेली या त्रिमूर्तींची गाणी हे या मैफिलीचे खास आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर अभिवाचन, एकपात्री सादरीकरण यातून ही स्मरणयात्रा अधिक रंगतदार केली जाणार आहे. पु लंचा खुमासदार विनोद, गदिमांची अप्रतिम शब्दकळा आणि सुधीर फडके यांच्या सुमधूर सुरावटी यामुळे ही मैफील जुन्या जाणत्या रसिकांना जसा स्मरणरंजनाचा आनंद देईल त्याचप्रमाणे नव्या पिढीला या तीन महान कलाकारांची ओळख करु न देईल असे स्वा.सावरकर प्रतिष्ठानतर्फेसांगण्यात आले. या कार्यक्र माचे सूत्रधार म्हणून अंबरिश ओक जबाबदारी सांभाळणत आहेत. हा कार्यक्र म ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर सादर केला जाणार असल्याने सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांनी अवश्य आयोजन करावे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मिळून पंचवीस कार्यक्र म सादर करण्याचा संकल्प सिध्दिस न्यावा असे आवाहन स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे. तरी इच्छुक संस्थांनी स्वा .वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेशी संपर्कसाधावा असे आवाहन केले आहे.
गदिमा - पुल - बाबुजी या त्रिमुर्तींचा स्मरणयात्रा होणार महाराष्ट्रभरात, ना नफा ना तोटा या तत्त्वावर होणार २५ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:37 IST
त्रिमुर्तींची आठवण साठवण हा कार्यक्रम महाराष्ट्रभरात सादर होणार आहे.
गदिमा - पुल - बाबुजी या त्रिमुर्तींचा स्मरणयात्रा होणार महाराष्ट्रभरात, ना नफा ना तोटा या तत्त्वावर होणार २५ कार्यक्रम
ठळक मुद्दे गदिमा - पुल - बाबुजी या त्रिमुर्तींचा स्मरणयात्रा होणार महाराष्ट्रभरातना नफा ना तोटा या तत्त्वावर होणार २५ कार्यक्रमत्रिमुर्तींची आठवण साठवण महाराष्ट्रभरात होणार सादर