शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

बँकांच्या उदासीन धोरणामुळे आत्मनिर्भर योजनेचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:20 IST

पथविक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडले; बँकांकडून सहकार्य नाही

- हितेन नाईकपालघर : पालघर नगरपरिषद हद्दीतील पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर योजनेअंतर्गत लाभ देण्याची घोषणा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली असली तरी बँकांकडून प्रत्यक्षात भांडवल उपलब्ध करून दिले जात नाही. मुद्रा लोनबाबतही अशीच परिस्थिती असून आम्हाला योग्य गॅरंटर (तारण) असल्याशिवाय बँका उभेच करीत नसल्याने या योजना फसव्या तर नाही ना, अशी शंका सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील पदपथावर भाजीपाला, कपडे आदी विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करून आपल्या कुटुंबाचा खर्च भागविणाऱ्या पथविक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्यांच्या उदरनिर्वाहावर विपरित परिणाम झालेला आहे. नव्याने व्यवसाय करण्यासाठी आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत खेळते भांडवल उपलब्ध करून त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र अशा छोट्या व्यावसायिकांना बँका उभ्याच करीत नसल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यामधील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पथविक्रेत्यांना दहा हजाराची आर्थिक मदत विनातारण कर्ज स्वरूपात बँकांमार्फत उपलब्ध केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळतच नसल्याच्या तक्रारी येत आहेत.एका सर्वेक्षणानुसार पालघर नगरपरिषद क्षेत्रात सुमारे दोन हजाराच्या आसपास व्यवसाय करणारे विक्रेते आहेत. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठीचा अर्ज करणे ही बाब किचकट व वेळखाऊ असून महा ई-सेवा केंद्रात लाभार्थ्याचे आधारकार्ड, इलेक्शन कार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे जमा केल्यावर त्यांना एक फॉर्म दिला जातो, तो फॉर्म भरून झाल्यावर त्याची प्रिंट नगरपरिषदेत दिल्यानंतर त्यांनी दिलेले दुसरे पत्र पुन्हा महा ई-सेवा केंद्रात भरून पूर्ण प्रक्रिया झाल्यावर नगर परिषदेत जमा करावी लागते.सुमारे १०० एक विक्रेत्यांनी आॅफलाईन अर्जही केले आहेत. तर शेकडोंनी आॅफलाईन अर्जही केले आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर नगरपरिषदेमार्फत शिफारसपत्र दिले जाते. त्यानंतर संबंधित बँकांनी पुढील प्रक्रिया करून हे कर्ज संबंधित विक्रेत्याला उपलब्ध करून द्यायचे आहे. मात्र बँकांकडून भांडवल उपलब्ध होत नसल्याने ही योजना फसवी असल्याची ओरड लाभार्थ्यांमधून केली जात आहे.पदपथविके्रत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जनजागृती करण्यात येत असून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. बँकांकडून योग्य प्रतिसाद नसल्याने त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे.- स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, पालघर