शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू; दोन तासांचा पायी प्रवास आता सात मिनिटांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 21:08 IST

Malanggad Funicular: या ट्रेनमुळे मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आला आहे. 

Malanggad Train: मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू झाली आहे. कित्येक वर्ष रखडून राहिलेल्या या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आले आहे. गेल्या वर्षभरापासून या सेवेची चाचणी सुरू होती. किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ झाला.

या ट्रेनमुळे मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आला आहे. 

या ट्रेनमुळे मलंगगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होईल तसेच इथल्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे. कल्याणजवळचे मलंगगड हे ठाणे जिल्ह्यातील हिंदू-मुस्लिम भाविकांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. 

सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेल्या मलंगगडावर जाण्यासाठी भाविकांना 2 तासांची पायपीट करावी लागते. त्यामुळे अनेक भाविकांना इच्छा असतानाही त्या ठिकाणी जाता येत नव्हते. 

अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्ल्डंच्या धर्तीवर याठिकाणी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करवून घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी वणीगड आणि मलंगगडासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केल्यांनतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले होते. 

वणी गडावरील रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतरही मलंगगडाचा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. या डोंगरावरील अवघड वळणावर काम करणे देखील अवघड जात होते त्यामुळे हे काम रखडलेल्या अवस्थेत होते. मात्र बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर मंलगगडावरील रेल्वेसेवाही सुरू झाली आहे.

मलंगगड ट्रेन मार्गिकेवर 2 ट्रेन धावणार असून एका ट्रेनला दोन प्रशस्त डब्बे आहेत. त्यातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकतील. भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा 24x7 तास देण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे. या फ्युनिक्युलर ट्रेनसाठी एकूण 70 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Malanggad Funicular Train Opens: Two-Hour Hike Now Seven Minutes

Web Summary : The long-awaited Malanggad funicular railway is now operational, cutting travel time from two hours to just seven minutes. This will boost tourism and ease access for devotees to the popular Hindu-Muslim shrine near Kalyan. Two trains operate on the route, carrying 1200 passengers per hour.
टॅग्स :thaneठाणेReligious Placesधार्मिक स्थळेtourismपर्यटन