शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम तरु णांनी केले हिंदू शेजा-यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 06:31 IST

धर्म आणि जातपात विसरून मुंब्य्रातील काही मुस्लिम तरु णांनी एका हिंदूबांधवाच्या अंतिम संस्काराचे सोपस्कार पूर्ण करून अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले. एकीकडे स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही काही भागांत आजही जात विसरली जात नसून एकमेकांच्या जातीवरून अनेकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर राग खदखदत असल्याचे नवीन वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या काही घटनांवरून पुन्हा एकदा दिसून आले.

- कुमार बडदेमुंब्रा : धर्म आणि जातपात विसरून मुंब्य्रातील काही मुस्लिम तरु णांनी एका हिंदूबांधवाच्या अंतिम संस्काराचे सोपस्कार पूर्ण करून अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले. एकीकडे स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही काही भागांत आजही जात विसरली जात नसून एकमेकांच्या जातीवरून अनेकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर राग खदखदत असल्याचे नवीन वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या काही घटनांवरून पुन्हा एकदा दिसून आले. ज्या दिवशी राज्यामध्ये जातीपातीवरून संघर्ष टिपेला पोहोचला होता, त्याच दिवशी स्वत:चे वाढदिवस विसरून मुंब्य्रातील काही मुस्लिम तरु णांनी एका हिंदूच्या अंतिम विधीत सहभागी होऊन धार्मिक सोपस्कार पूर्ण करून अनोख्या एकात्मतेचा संदेश दिला.मूळचे बिहार राज्यातील परंतु मागील काही वर्षांपासून मुंब्य्रातील शिवाजीनगर भागातील गमई चाळीत राहणारे राम बिहारीलाल मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर येथील खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. नगरसेवक अशरफ पठाण यांनी हे कळताच त्यांच्या सहकारी मित्रांना लाल यांच्या घरी पाठवले. तेथे गेल्यावर महेशर शेख, शाकीब दाते, जैनुउद्दीन शेख आणि सलीम या तरु णांनी परिस्थितीचा अंदाज घेतला असता लाल यांच्या घरात त्यांची वृद्ध आई, पत्नी आणि चार लहान मुले असल्याचे तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर, त्या तरु णांनी आजूबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने अंतिम संस्काराची जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही जणांनी ठाण्याहून अंतिम संस्काराचे सामान आणले तसेच चौघांनी जातपात विसरून मृतदेहाला खांदा दिला आणि अंतिम विधीसाठी शव अग्निशमन केंद्राजवळील स्मशानभूमीत नेले. तेथे पहाटे अंतिम विधी होईपर्यंत चौघे थांबले. त्या चौघांपैकी महेशर आणि शाकीब हे दोघे त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मंगळवारी रात्री मुंबईला जाणार होते. लाल यांच्या घरातील घटनेची माहिती मिळताच त्यांनी वाढदिवसाला दुय्यम स्थान देऊन लाल यांच्या अंत्यसंस्काराला प्राधान्य दिले. त्यांच्या या कामाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :mumbraमुंब्राDeathमृत्यू