शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गंगुबाई शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:38 IST

शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे यांचे बुधवारी रात्री निधन झाले.

ठाणे : शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.गंगुबार्इंच्या निधनप्रसंगी शिंदे हे निवडणुकीच्या प्रचारासाठी पालघरला होते. परंतु, हे वृत्त समजताच त्यांनी ठाण्यात धाव घेतली. बुधवारी रात्रीच रु ग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. गुरुवारी सकाळी ठाण्याच्या लुईसवाडी परिसरात असलेल्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार खासदार राजन विचारे, खासदार कपिल पाटील, भाजपचे आमदार संजय केळकर, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अंत्यदर्शन घेतले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून यावेळी हजारो शिवसैनिक यावेळी हजर होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास किसननगर येथील जुन्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर, वागळे इस्टेट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.>राष्ट्रवादीच्या सभा स्थगितपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी त्यांचा ठाणे विधानसभा,ओवळा माजिवडा विधानसभा व कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारदौरा आणि चौकसभा रद्द केल्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दु:खात परांजपे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले.