शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप

By सदानंद नाईक | Updated: September 29, 2024 19:09 IST

शिंदेंसेना व स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध, पोलिसांकडून धरपकड

सदानंद नाईक/ उल्हासनगर : शिंदेंसेना व स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीत प्रचंड पोलीस बंदोबस्तात सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. शिंदेंसेना व स्थानिक नागरिकांच्या विरोधकामुळे शांतीनगर स्मशानभूमी परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस बंदोबस्तापुढे तणावपूर्ण वातावरण निवळे होते.

उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर स्मशानभूमी मध्ये सकाळी ११ वाजता दफन करण्यासाठी एक खड्डा काहीजण खोदत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. त्यांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती शिंदेंसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना दिल्यावर चौधरी यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी शांतीनगर स्मशानभूमीकडे धाव घेऊन खोदलेला खड्डा भुजविला. तसेच अंत्यसंस्कार करू देणार नाही. असा पवित्रा घेतल्याने, तणाव निर्माण झाला. बदलापूर येथील राहणारा अक्षय शिंदे यांचे उल्हासनगरात अंत्यसंस्कार का? असा प्रश्न चौधरी यांच्यासह नागरिकांनी पोलिसांना केला. अखेर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेऊन आंदोलन करणाऱ्या चौधरी यांच्यासह नागरिकांची पोलिसांनी समजूत काढली. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने, अखेर पोलिसांनी धडपकड करून अटक केली.

स्मशानभूमी शिलबंद शिंदेसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, रवींद्र निकम, बाळा श्रीखंडे यांच्यासह असंख्य जणांची दुपारी ३ वाजता पोलिसांनी धडपकड करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणले. तर जमलेल्या स्थानिक नागरिकांना पोलिसांनी पिटाळून लावत स्मशानभूमीचे प्रवेशद्वार बंद केले. पोलिसांचा बंदोबस्त ठेवून स्मशानभूमीत जाण्यास प्रतिबंद केला.

खोदलेला खड्डा बुजविला शिंदेंसेनेचे राजेंद्र चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक व महिलांनी अक्षय शिंदे यांच्या अंत्यसंस्काराला विरोध करीत अंत्यसंस्कार साठी खोदलेला खड्डा बुजविण्यात आला. यावेळी नागरिकांनी अंत्यसंस्काराला विरोध करीत घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडले.

नाक्यावरील कामगारांनी खोदला खड्डाशांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाल्यावर पोलिसांनी शिवाजी चौकातून काही नाका कामगार आणून त्यांच्याकडून खड्डा खोडल्याचे बोलले जात आहे. 

मिडियाला नो एन्ट्रीअंत्यसंस्कार ठिकाणी काही अप्रिय घटना होऊ नये म्हणून मोजक्या नातेवाईकांना सोडण्यात आले. मीडिया प्रतिनिधीला आत मध्ये एन्ट्री देण्यात आली नाही. त्यामुळे पत्रकारांनी पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :badlapurबदलापूरulhasnagarउल्हासनगर