शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

लग्नाचा दबाव झुगारल्याने स्वप्न पूर्ण- झरीन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:14 IST

नोकरी करून शिकणार

- कुमार बडदेमुंब्रा : झरीन खान बारावीची परीक्षा उत्तीर्ण होताच तिच्या घरी तिच्या लग्नाचे पाहायला सुरुवात झाली होती. मात्र आपल्याला लागलीच लग्न करायचे नाही हे तिने आपल्या आई-वडिलांना बजावले. नोकरी करीत तिने सीए (आयपीसीसी) ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा देशभरात अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण केली. आता तिच्यावर तिचे आई-वडील कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. मुलीचे लग्न करुन मोकळे होण्याची चूक केली नाही हे उत्तम झाले हे त्यांना आता उमजले आहे.मुस्लिम समाजात मुलींचे लहान वयात लग्न केले जाते. झरीनच्या उच्च शिक्षणातही लग्नाचे विघ्न आले होते. बारावी उत्तीर्ण होताच झरीनचे लग्न करण्याकरिता नातलग, आजूबाजूचे यांचा कुटुंबावरील दबाव वाढू लागला. झरीनचे आई-वडील तिने लग्न करावे याकरिता तिच्या मागे लागले होते. मात्र आपल्याला इतक्यात लग्न करायचे नाही. सीए उत्तीर्ण व्हायचे आहे, असे झरीनने घरच्यांना सांगितले. तिचा हा निर्णय स्वीकारताना घरच्यांना थोडे जीवावर आले. वेळीच मुलीचे लग्न झाले नाही तर समाज काय म्हणेल, याची धास्ती होती. मात्र लहानपणापासून झरीन खूप हुशार आहे हे ठावूक असल्याने तिचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तिला एक संधी देण्याचे घरच्यांनी ठरवले आणि त्या संधीचे तिने सोने केले.झरीनचे वडील नवी मुंबईत गरेजमध्ये मेकनिकचे काम करतात तर आई गृहीणी आहे. झरीन गणितात अत्यंत हुशार असल्याने तिने सीए व्हावे याकरिता तिच्या भांडुप येथील महाविद्यालयातील काही सिनीयर मित्रमैत्रिणींनी तिला प्रोत्साहन दिले. फरीदाबादच्या विराज अरोरा यांच्या सीए (आयपीसीसी) परीक्षार्थिंकरिता असलेल्या क्लासमध्ये तिने प्रवेश घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन पद्धतीने तिने सीए परीक्षेचा अभ्यास केला. झरीन नोकरी करीत असल्याने तिने आपल्या पगारातून स्मार्ट फोन घेतल्यानेच तिला ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य झाले. देशात अव्वल आल्याने आता अधिक चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, अशी तिची अपेक्षा आहे. सीए अंतिम वर्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले.देशातील शिक्षणाची आवड असलेल्या प्रत्येक मुस्लीम मुलीने उच्च शिक्षण घेण्याकरिता आपल्या कुटुंबीयांना राजी केले पाहिजे. लग्न करुन संसारात बसल्यावर मुलींचे शिक्षण थांबते व अनेक हुशार मुलींची प्रगती खुंटते. मुस्लीम समाजातील मुलींच्या पालकांनीही लग्न ही मुलीच्या आयुष्यातील इतिश्री मानू नये.- झरीन खान, देशात सर्वप्रथम, सीए (आयपीसीसी)