शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अवैधरित्या कत्तलखाने सुरू, शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:49 IST

भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट ...

भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.त्यामुळे नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल या संस्थेतील धर्मपाल या व्यक्तीने राज्यातील कत्तलखान्या विरोधात पुणे खंडपीठाकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने केलेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने केलेल्या पहाणीत जनावरांचे रक्तांवर प्रक्रीया न करता ते सांडपाण्याबरोबर वाहून दिले जाते.तसेच टाकावू अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या मार्गदर्शक अटी दिलेल्या होत्या त्याची महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने अंमलबजावणी न केल्याने शहरातील सर्व कत्तलखाने मनपाच्या मार्केट विभागाने बंद केले आहेत.असे असताना शहरातील काही ठिकाणी दररोज मोठ्या जनावरांच्या उघड्यावर कत्तली केल्या जात आहेत.तर जनावरांची कत्तल झाल्यानंतर निघालेले रक्त गटारातून वाहून जात आहे. त्यापैकी कसाईवाड्यात ज्या ठिकाणी कत्तली केल्या जात आहेत त्या परिसरांत उर्दु माध्यमांच्या दोन शाळा आहेत. तेव्हा या रस्त्यावरून जाणा-या - येणा-या विद्यार्थ्यांना तेथे बांधलेल्या जनावरांपासून धोका निर्माण झाला आहे. तर या परिसरांत पसरलेल्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकायदेशाीरपणे होणारी कत्तल थांबवून पालिकेचे कत्तलखाने सुरू करावेत, अशी मागणी करीत मानवाधिकार फाऊंडेशन व इंडियन युवा मोर्चा यांच्या मार्फत आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन दिले.

टॅग्स :thaneठाणे