शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खूनाचा प्रयत्न करुन तीन वर्षापासून फरारी आरोपी अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:04 IST

खूनाचा प्रयत्न करुन गेल्या तीन वर्षांपासून पसार झालेल्या अभिषेक भोसले उर्फ गुड्डू (२९, रा. डोंबीवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली.

ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईश्रीनगर पोलिसांच्या दिले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: खूनाचा प्रयत्न करुन गेल्या तीन वर्षांपासून पसार झालेल्या अभिषेक भोसले उर्फ गुड्डू (२९, रा. डोंबीवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली. त्याला श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुरुवारी दिली.खून तसेच खूनाचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्हयांमध्ये पाहिजे किंवा फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी पोलिसांना दिले आहेत. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खूनाचा प्रयत्न तसेच आर्म अ‍ॅक्टच्या गुन्हयात अभिषेक भोसले याचा पोलीस शोध घेत होते. याच पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाकडूनही भोसलेसह अशाच पाहिजे (वॉन्टेड) आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत होता. तो मुंबई महापालिकेत नोकरी करीत असून मुंबईतील महापालिका कार्यालयात येणार असल्याची टीप खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे आणि संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, हवालदार संदिप भोसले, सुहास म्हात्रे आणि भगवान हिवरे आदींच्या पथकाने अभिषेक याला २५ जानेवारी २०२२ रोजी मुंबईतून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने डोंबिवलीत वास्तव्याला असल्याचे सांगितले सांगून वागळे इस्टेट भागात खूनाचा प्रयत्न केल्याचीही कबूली दिली. त्याला पुढील कार्यवाहीसाठी श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, त्याला १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* अनुकंपा तत्वावर मिळविली नोकरी-अभिषेक याने अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी मुंबई महापालिकेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील लेखा शाखेत २०१५ मध्ये शिपाई पदावर नोकरी मिळविली होती. त्यानंतर २०१९ मध्ये वागळे इस्टेटमधील एका गुंडाला शोधताना त्याचा पत्ता न सांगणाऱ्यावर खूनी हल्ला करुन पसार झाला होता. त्यानंतर कोणालाही पत्ता लागू न देता तो महापालिकेत नोकरी करीत असल्याचे आढळल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक