शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार होतोय वीजपुरवठा खंडित, वीजबिले न भरण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 06:47 IST

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याप्रकरणी येथील पूर्वेकडील रामनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी एमआयडीसीतील महावितरण कार्यालयात धडक दिली.

डोंबिवली : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याप्रकरणी येथील पूर्वेकडील रामनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी एमआयडीसीतील महावितरण कार्यालयात धडक दिली. वीजसमस्येबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास २४ जुलैपासून विजेची बिले भरली जाणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.पूर्वेकडील रामनगर, उर्सेकरवाडी, शिवमार्केट, म्हात्रेनगर, आयरेगाव आदी परिसरात अडीच महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सतत खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी याबाबतची तक्रार, मनसेचे स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांच्याकडे केली होती. अधिकाºयांशी संपर्क साधूनही वीजपुरवठ्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याप्रकरणी सोमवारी हळबे यांच्यासह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, विशाल बढे, प्रथमेश खरात, प्रकाश थोरात, सागर तांबे, समीर भोर आदी पदाधिकाºयांनी हेमंत ताम्हाणे, नरेश खेडेकर, संदीप पाटील, राजन गाला, प्रकाश हिंगणे, सुशील सामंत आदी रहिवाशांना घेऊन एमआयडीसीतील महावितरणचे कार्यालय गाठले आणि वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याबाबत विचारणा केली. यावेळी कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्याशी चर्चा करण्यात आली. देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागत असल्याचे कारण यावेळी बिक्कड यांनी दिले. यावर आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळित न झाल्यास विजेची बिले भरणार नाही, असा इशारा मनसेने दिला.>शुक्रवारी विशेष मोहीमदोन एजन्सींमार्फत देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. रामनगर आणि अन्य परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असलेल्या तक्रारीसंदर्भात शुक्रवारी विशेष मोहीम राबवून तक्रारीचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन रहिवासी आणि मनसेच्या पदाधिकाºयांना कार्यकारी अभियंता बिक्कड यांनी दिले.

टॅग्स :electricityवीज