शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

डायलेसीस सेंटरच्या माध्यमातून गरीब रुग्णांना मिळणार मोफत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 17:45 IST

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना आता ठाणे महापालिकेने शहरातील तीन ठिकाणी पहिल्या टप्यात डायलेसीस केंद्राची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यांचे उत्पन्न एक लाखापर्यंत कमी असेल त्यांना ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे.

ठळक मुद्देपाच पैकी तीन सेंटर सोमवार पासून ठाणेकरांच्या सेवेत होणार रुजु१ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाºयांना मिळणार मोफत सुविधाप्रत्येक केंद्रावर १० डायलेसीस मशिनची सेवा उपलब्धरोज ४० रुग्ण घेऊ शकणार याचा लाभ

ठाणे - कोपरी येथील प्रसुतीगृहात सुरु करण्यात आलेल्या नव्या डायलेसीस सेंटरचा शुभारंभ बुधवारी सांयकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आता सोमवार पासून हे सेंटर ठाणेकरांच्या सेवेत रुजु होणार आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात पाच ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या डायलेसिस सेंटरमध्ये १ लाखांपर्यंत कमी उत्पन्न असलेल्या रु ग्णांना ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या तीन केंद्राचे उदघाटन करण्यात आली असून ज्या रुग्णांना डायलेसिसची आवश्यकता आहे त्यांनी या केंद्रामध्ये जाऊन उपचार घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .ठाणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या  डायलेसीसच्या रुग्णांना अल्प दरात डायलेसीसच्या सुविधा उपलब्ध करु न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. विशेष म्हणजे कळवा रुग्णालयात सुरु असलेल्या डायलेसीस सेंटरचा मुद्दा काही वर्षांपूर्वी चांगलाच वादादीत ठरला होता. गोर गरीब रुग्णांकडून हवे तर आकरले जात होते. त्यामुळे हे डायलेसीस सेंटर बंद करुन गोरगरीब रुग्णांना मोफत किंवा अल्प दरात अशा प्रकारची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती सभापती तथा विद्यमान सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपूर्वी शहरात पाच ठिकाणी डायलेसिसची केंद्र उभारण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या होत्या. आता दोन वर्षानंतर अखेर ही डायलेसिस केंद्र सुरु करण्यात आली आहे . यासाठी प्रत्येक केंद्रांवर १० डायलेसिस मशीन अशा पाच केंद्रांवर ५० मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रांवर १० बेड असे पाच केंद्रांवर ५० बेड्स उपलब्ध करु न देण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे असून सुरु वातीला तीन केंद्र कार्यान्वयीत करण्यात आली असून उर्वरित दोन सेंटर येत्या दीड ते महिन्यात सुरु होतील अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ . आर टी केंद्रे यांनी दिली आहे .या डायलिसीस केंद्रांच्या माध्यमातून ज्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे त्या रूग्णांवर मोफत डायलिसीस उपचार करण्यात येणार आहेत. तर ज्यांचा वार्षिक उत्पन्न गट १ लाख ते ८ लाख आहे, त्या रूग्णांसाठी ५२० रूपये फी आकारण्यात येणार आहेत. तसेच ज्यांचा वार्षिक उत्पन्न गट ८ लाखाच्यावर आहे त्या रूग्णांसाठी १०४० रूपये फी आकारण्यात येणार आहे. या प्रत्येक केंद्रामध्ये १० बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर दिवसभरात ४० रूग्णांना डायलेसिसचे उपचार देता येवू शकणार आहेत. शहरात पहिल्या टप्प्यात कोपरी प्रसुती गृह, कोपरी (पुर्व), कोरस रु ग्णालय, वर्तकनगर, ठाणे(प.) आणि रोझा गार्डिनिया हॉस्पीटल, कासारवडवली अशा तीन ठिकाणी ही डायलिसीस केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तर उर्वरीत सी आर वाडिया रु ग्णालय, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आरोग्य केंद्र येत्या दोन महिन्यात सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेhospitalहॉस्पिटल