शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात ठाण्यात माकडांचा मुक्त वावर; रहिवाशी परिसरात करतायेत सफारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 18:14 IST

मागील 21 मार्च पासून संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे.

ठाणे : गाड्यांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नाही, प्रदुषणाचा विळखा नाही सगळे कसे जंगलात असलेल्या शांतते सारखे. लॉक डाऊनमुळे शहरातही अशीच काहीशी परिस्थिती झालीये यामुळे मग आता जंगली प्राणी का बरे मुक्त वावर करणार नाहीत ठाण्यात असाच काहीसा प्रकार घडलाय बोरिवली नॅशनल पार्क ठाणो शहरा लगतच असल्याने या जंगलातील माकडांनी गुरुवारी चक्क संपुर्ण ठाण्याची सफर केली आणि बघता बघता ठाणो पश्चिमेला स्टेशन जवळील घंटाळी रोडवर ही माकडे पोहोचली. या झाडावरु न त्या झाडावर माकडांचा खेळ सुरु  होता हे ठाणोकर पाहून सुखावले आणि त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये हा क्षण कैद केले.

मागील 21 मार्च पासून संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांसोबत, नागरीकांची वर्दळही कमी झाली आहे. वाहनांचे आवाजही बंद झाले आहेत. तसेच जंगल सफारींवरही त्याचा परिणाम झाला आहे, या ठिकाणी देखील नागरीक फिरकत नसल्याने येथील वन्यप्राणी प्राणी संग्रहालयात मुक्त संचार करतांना दिसत आहेत. परंतु आता येऊर, आणि त्याच्या बाजूलाच लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसरातून अनेक प्राणी आता रस्त्यांवर मोकळे फीरु लागले आहे.

काही दिवसांपूर्वी येऊरच्या रस्त्यांवर घोडबंदर भागातील काही भागात बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला होता. त्यानंतर चक्क नौपाडा, ठाणो स्टेशनच्या भागात माकडांचा मुक्त संचार सुरु असल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी शहरातील घंटाळी भागात अशाच प्रकारे माकडांनी झाडांवरुन तर काही वेळेस रस्त्यावरुन मुक्त संचार केल्याचे दिसून आले. त्यामुळे हा मुक्त संचार अनेक नागरीकांना आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMonkeyमाकडthaneठाणे