शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलची हौस भागविण्यासाठी घरकाम करणार्‍या ठाण्यातील महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 18:32 IST

मोटारसायकलची हौस भागविण्यासाठी अहमदनगरच्या एका युवकाने ठाण्यातील एका विवाहित महिलेची फसवणूक केली. ही महिला दोन मुलांची आई असून, आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देपीडित महिला दोन मुलांची आईआरोपी युवक अहमदनगरचालग्नाचे आमिष दाखविले

ठाणे : घरकाम करणार्‍या दोन मुलांच्या आईला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करणार्‍या अहमदनगरच्या एका युवकास नौपाडा पोलिसांनी अटक केली. मोटारसायकलची हौस भागविण्यासाठी त्याने महिलेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.ठाण्यातील खोपट येथील भाजीवाला चाळीत राहणारी ३२ वर्षीय महिला लोकांकडे घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. तिला दोन मुले असून, तिचा पती मुरबाड येथे वेगळा राहतो. ती मखमली तलावजवळ राहणार्‍या एका कुटुंबाकडे घरकामाला जायची. याच भागातील एका सोसायटीतील इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी असलेला आरोपी मनोज वाघमारे उर्फ मनोहर किसन वाघमारे हा टिटवाळ्यातील हरीओम व्हॅलीमध्ये वास्तव्यास असून, मखमली तलावाजवळील इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामावर तो पर्यवेक्षक म्हणून काम करतो. एकाच भागात काम करताना आरोपी मनोज आणि पीडित महिलेची नोव्हेंबर २0१७ मध्ये ओळख झाली. हळुहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्न करून आपण सुखात जिवन जगू, असे स्वप्न आरोपीने पीडित महिलेला दाखविले. दोघांच्या भावी आयुष्यासाठी लहानसे घर विकत घेऊ, असेही आरोपीने तिला सांगितले. त्यासासाठी काही पैसे मी देतो, काही तु जमव असे आरोपीने तिला सांगितले. आरोपीच्या भूलथापांना बळी पडून पीडित महिलेने २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २0१७ या काळात थोडे-थोडे करून आरोपीला एक लाख २0 हजार रुपये दिले. पीडित महिलेने थोडे-थोडे करून साठवलेले पैसे मनोजला दिले. एवढेच नव्हे तर स्वत:चे दागिने गहाण ठेऊन आलेला पैसाही आरोपीला दिला. आरोपीने मात्र हा पैसा घरासाठी नव्हे तर मोटारसायकल विकत घेण्यासाठी वापरला. दरम्यानच्या काळात महिलेचे दागिने घरात नसल्याचे तिच्या कुटुंबियांना समजले. त्यांनी विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. पीडित महिलेने रविवारी याप्रकरणी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. ओऊळकर यांनी गुन्हा दाखल करून आरोपी मनोज वाघमारेला अटक केली. त्याला १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस