लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महागडी वाहने व्यवसायाला लावण्याच्या नावाखाली मनोरमानगर येथील कमलेश जैसवार यांची तब्बल ७२ लाखांची फसवणूक करणाऱ्या शेषकुमार दुबे (रा. नालासोपारा) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.शेषकुमार दुबे उर्फ रिंकू (मुळ रा. बहरी, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश ) याने १ आॅगस्ट ते १ सप्टेंबर २०२० या कालावधीत जैसवार यांचा १७ लाखांचा ट्रक त्याचबरोबर ११ लाख, १६ लाख आणि १२ लाख अशी ७२ लाखांची पाच वाहने माल वाहतूकीच्या व्यवसायामध्ये लावतो आणि त्याद्वारे नफा कमवून देतो, अशी बतावणी केली. याच अमिषापोटी त्यांच्याकडून ही पाच मोठी वाहने नेली. त्यापोटी त्यांना तसेच संजयलाल सिंह यांना कोणताही परतावा दिलाच नाही. उलट, स्वत:च्या फायद्यासाठी ७२ लाखांच्या पाचही वाहनांचा परस्पर अपहार केला. वारंवार पाठपुरावा करुनही जैसवार यांना यामध्ये कोणताच मोबदला मिळाला नाही. अखेर जैसवार यांनी याप्रकरणी २८ डिसेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक बी. एस. पवार हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
वाहने व्यवसायाला लावण्याच्या नावाखाली ७२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:06 IST
महागडी वाहने व्यवसायाला लावण्याच्या नावाखाली मनोरमानगर येथील कमलेश जैसवार यांची तब्बल ७२ लाखांची फसवणूक करणाऱ्या शेषकुमार दुबे (रा. नालासोपारा) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
वाहने व्यवसायाला लावण्याच्या नावाखाली ७२ लाखांची फसवणूक
ठळक मुद्दे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हाआरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले