लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जळगाव जिल्हा सहकारी बँकेची जागा विकत घेण्यासाठी निविदा प्रक्रियेतील सहभागासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक करणाऱ्या आनंद अय्यर (वय ४९, रा. वल्लीपीर, कल्याण) आणि धनराज शहा ऊर्फ मुन्ना (रा. कल्याण, ठाणे) या दोघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी बुधवारी दिली. त्यांच्याकडून १७ लाख २० हजारांची रोकड जप्त केली आहे.ठाण्यातील वकील प्रणिल सोनवणे यांना फेब्रुवारी २०२० मध्ये आनंद आणि धनराज यांनी आपसात संगनमत करून जळगाव जिल्हा सहकारी बँकेची जागा विकत घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत आर्थिक मदतीचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करून अपहार केला होता. याप्रकरणी अलीकडेच नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ आणि निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक विनोद लभडे, हवालदार साहेबराव पाटील आणि सुनील राठोड आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्याआधारे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी यातील मुख्य आरोपी आनंद याला अटक केली होती. त्याच्याच चौकशीमध्ये त्याचा साथीदार आणि धनराज यालाही १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली. याचदरम्यान त्यांच्याकडून १७ लाख २० हजारांची रोकडही हस्तगत केली. दोघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
जळगाव जिल्हा बँकेची जागा खरेदी प्रक्रियेतील सहभागासाठी २५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 00:25 IST
जळगाव जिल्हा सहकारी बँकेची जागा विकत घेण्यासाठी निविदा प्रक्रियेतील सहभागासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक करणाऱ्या आनंद अय्यर (वय ४९, रा. वल्लीपीर, कल्याण) आणि धनराज शहा ऊर्फ मुन्ना (रा. कल्याण, ठाणे) या दोघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी बुधवारी दिली.
जळगाव जिल्हा बँकेची जागा खरेदी प्रक्रियेतील सहभागासाठी २५ लाखांची फसवणूक
ठळक मुद्देदोघांना अटकनौपाडा पोलिसांची कामगिरी