शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेबसिरिजला एक कोटींचे फंडिग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 21:58 IST

वेबसिरिजला एक कोटींचे फंडिग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक करणाऱ्या संतोष गोविंद मोरे (४६, रा. कोपरी, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली.

ठळक मुद्दे टोळीतील एकास अटककापूरबावडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वेबसिरिजला एक कोटींचे फंडिग करण्याच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक करणाऱ्या संतोष गोविंद मोरे (४६, रा. कोपरी, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.संतोष तसेच त्याच्या अन्य तीन साथीदारांनी मुंबईतील नायगाव येथील रहिवाशी असलेल्या चित्तरंजन सिंग (२३) यांना वेबसिरिज तयार करण्यासाठी एक कोटींचे फंडिंग करतो, असे अमिष दाखविले. त्यासाठी सिंग यांना अगरवाल याने २० लाखांची रोख रक्कम घेऊन कापूरबावडी ते बाळकूम रोडवर रेवाळी तलावाच्या बाजूला २७ जून रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास बोलविले. तिथे संतोष मोरे, इमरान आणि अन्य एका अनोळखीने आपसात संगनमत करुन त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली. ते त्याठिकाणी धाड टाकण्यासाठी आले असल्याचेही त्यांनी भासविले. नंतर त्यांनी सिंग यांच्याकडील २० लाख रुपयांची बॅग घेऊन तिथून कारमधून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी सिंग यांनी २९ जून रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने २८ जून रोजी संतोष मोरे याला अटक केली. त्याला सुरुवातीला २ जुल २०२१ ैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या टोळीतील अन्य तिघांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी