शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आता चारचाकी वाहनांची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून होणार; भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 16:55 IST

वस्तू / पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या 'व्यवसाय विकास युनिट्स'  ने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक आणि जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे. 

डोंबिवली - भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पनांची सुरुवात झाली आहे, कारण उर्जेच्या गरजेसाठी स्वावलंबी होण्याचा रेल्वे प्रयत्न करीत आहे, रेल्वेने २०३० पर्यंत 'शून्य' कार्बन उत्सर्जनाचे  मोठ्या प्रमाणातील  परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या समन्वयामुळे मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रासारख्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतातील काही भागांत पाठविण्यासाठी कार रेल्वेने पाठविणे सुरू केले आहे. त्याद्वारे मौल्यवान इंधनाची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट मिळविता  येते.

वस्तू / पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या 'व्यवसाय विकास युनिट्स'  ने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक आणि जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे.  मेसर्स महिंद्रा आणि महिंद्रा यांच्याशी समोरासमोर झालेल्या एकत्रित बैठकीमुळे वाहने जास्त प्रमाणात लोड झाली.  त्यांची वाहने पोचविण्यासाठी प्रथम पासून शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देखील आहे.  या माध्यमामुळे आपल्या प्लांटमध्ये तयार झालेल्या नवीन वाहनांना देशातील विविध शहरांमधील डिलर्सकडे नेण्यासाठी लागणारा  वेळ कमी होतो.

विशिष्ट  रॅकमधून वाहने पाठवली जातात.  अशा एका रेकमध्ये ११८ वाहने नेऊ शकतात तर  नवीन उच्च क्षमता असलेली बीसीएसीबीएम रेल्वे वाघिणीची  रेक अंदाजे ३०० वाहने वाहून नेऊ शकते.  सध्या, रेल्वे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी न्यू मॉडिफाइड गुड्स (एनएमजी) रॅक आणि खाजगी मालकीचे बीसीएसीबीएम रॅकचा वापर करते.  वाहूकीची वेळ कमी करण्यासाठी या रॅक्सच्या वाहतुकी वर बारीक नजर ठेवली जात आहे आणि त्यानंतर पुढील लोडिंगसाठी हे रॅक्स उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे. 

महाराष्ट्र हे एक मोठे ऑटोमोबाईल वाहन केंद्र आहे, जिथे महिंद्र, टाटा, फोर्ड, पियाजिओ, बजाज इत्यादी कंपन्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद भागात वाहने तयार करतात.  महाराष्ट्रात उत्पादित वाहने (ऑटोमोबाईल) देशाच्या विविध भागात नेण्याची बरीच क्षमता आहे. मेसर्स टाटा मोटर्स व इतर वाहन कंपन्यांसमवेत 'व्यवसाय विकास युनिट्स'च्या  बैठका घेतल्या गेल्या आहेत आणि वाहतुकीसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.  मेसर्स मारुतीनेही या आर्थिक वर्षात फ्रेट ट्रेनचा वापर करून देशभरातून १.७८ लाख मोटारींची वाहतूक ५ लोडिंग टर्मिनल्सवरून नागपूर व मुंबईसह १३ गंतव्य टर्मिनलवर केली आहे.

 जुलै २०२० मध्ये मध्य रेल्वेने १८ रेकद्वारे  मोटारींची  वाहतूक केली आहे, तेही कमी खर्चाने. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने  दौंडहून प्रथमच मोलॅसेस अल्कोहोल कचर्‍यापासून निर्मित अ‍ॅग्रो बेस्ड खताची (पोटाश) वाहतूक केली आहे.  नागपूर विभागातील बैतूल व मुलताई स्थानकांवरून नव्याने  गव्हाची  वाहतूक, खंडवा व पारस येथून मका;  भुसावळ विभागातील चाळीसगाव येथून भुसा  वाहतूक सुरू झाला आहे.  मध्य रेल्वेचे इतर लक्ष्यित वस्तू फ्लाय- अ‍ॅश, कापूस इत्यादी आहेत. बांगलादेशला  निर्यातीसह कांदा लोडिंगमध्येही बरीच वाढ झाली आहे.  कार्बन फूटप्रिंट वाचविण्यात सहभागी होण्यासाठी  ग्राहकांनी मध्य रेल्वेशी  हातमिळवणी करण्याचे रेल्वेने आवाहन केले असल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ ए के सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे