शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

मुंब्रा-कळवा दरम्यान चालत्या ट्रेनमधून पडल्यानं चार प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:36 IST

लोकलची संख्या कमी असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल

ठाणे: चालत्या लोकलमधून चार प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंब्रा-कळवा दरम्यान घडली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन प्रवाशांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं. काल झालेल्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. लोकल गाड्यांची संख्या कमी असल्यानं प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत आहे. लोकलमध्ये मोठी गर्दी असल्यानं प्रवाशांवर लटकून प्रवास करण्याची वेळ आली. जीव मुठीत धरुन प्रवास करणारे मुंब्रा-कळवा दरम्यान चार जण चालत्या गाडीतून खाली पडले. नाजमीन शेख, नाजीर शेख, निखिलेश कुबल अशी लोकलमधून पडलेल्यांची नावं आहेत. तर चौथ्या प्रवाशाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. नाजमीन शेख यांच्या हाताला, पायाला आणि मानेला मुका मार लागला आहे. तर नाझीर शेख यांच्या पायाला दुखापत झाली आहे. निखिलेश कुबलच्या डोक्याला मार लागला आहे. नाझीर शेख, निखिलेश कुबल आणि एका जखमी तरुणाला उपचारानंतर सोडून देण्यात आलं. तर नाजमीन शेख यांच्यावर कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  मुसळधार पावसामुळे काल दिवसभर बंद असलेली मध्य रेल्वेची सेवा आज सुरू झाली. मात्र लोकलची संख्या कमी असल्यानं प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळाली. आज पाऊस नसतानाही रेल्वे विभागाने रविवारच्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या सुरु केल्याने सकाळपासूनच बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली. त्यात रविवारच्या वेळपत्रकामुळे प्रवासी संख्या जास्त आणि रेल्वे गाड्यांची संख्या कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.  

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे