शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

अधिकाऱ्याचे पिस्टल चोरणा-या चौघांना अटक, खंडणीसाठी केली होती चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 12:20 AM

महेंद्र दुधनव (२३) या सराईत चोराने साथीदारांच्या मदतीने कापूरबावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे यांचे शासकीय पिस्टल शनिवारी रात्री चोरले होते.

ठाणे : आता चोरी करणे सोडले असून मला नोकरीला लावा. मी ती चांगल्या प्रकारे करेन, असा दावा करणा-या महेंद्र दुधनव (२३) या सराईत चोराने साथीदारांच्या मदतीने कापूरबावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे यांचे शासकीय पिस्टल शनिवारी रात्री चोरले होते. महेंद्र याच्यासह चौघांनाही रविवारी कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्टलही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वंजारे यांना ३ जानेवारी रोजी ठाणे पोलीस मुख्यालय येथे स्ट्राँग कैदी पार्टीची ड्युटी दिली होती. त्यांची ड्युटी ठाणे मध्यवर्ती कारागृह याठिकाणी असल्यामुळे ते मोटारसायकलने त्याठिकाणी गेले. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर ठाणे कारागृह येथून ते साध्या गणवेशात पोलीस ठाण्याकडे निघाले. त्यावेळी मोटारसायकलच्या डिक्कीमध्येच त्यांनी गणवेश आणि रिव्हॉल्व्हर ठेवले होते. कामकाज संपल्यानंतर मोटारसायकल पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये उभी करून ते कल्याण येथील घरी गेले. ४ जानेवारी रोजी सकाळी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ते आले. त्यावेळी डिक्कीमधील गणवेश त्यांनी काढला. मात्र, त्यांचे शासकीय पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे चोरीस गेल्याचे आढळले. डिक्कीचे लॉक बनावट चावीने उघडून या पिस्टलची चोरी झाल्याचे आढळले. याप्रकरणी त्यांनी तातडीने आपल्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ, राजेंद्र तोरडमल, पोलीस हवालदार राजू मोरे आणि संतोष गुरव आदींच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्येच माजिवडा परिसरातून महेंद्र दुधनव (२३), भीमराज मलिंगे (१९) आणि त्यांचे अन्य दोन अल्पवयीन साथीदार अशा चौघांना ताब्यात घेतले. महेंद्र आणि भीमराज यांच्याविरुद्ध यापूर्वीही चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी उकळण्यासाठी तसेच जबरी चोरीसाठी त्यांना पिस्टलची गरज होती. यातूनच हे कृत्य केल्याची कबुली त्यांनी दिली.>नोकरीसाठीकेली होती याचनामहेंद्रसह चौघेही आरोपी हे माजिवडा भागातील साईनाथनगर येथील रहिवासी आहेत. महेंद्र याला एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात कापूरबावडी पोलिसांनी महिनाभरापूर्वी अटक केली होती.त्यानंतर, त्याने आपण आता चोरी करणे सोडल्याचा दावा करीत सहायक पोलीस निरीक्षक वंजारे यांच्याकडे नोकरीसाठी काही दिवसांपूर्वी याचना केली होती. त्यासाठी तो त्यांच्याकडे वारंवार फेºया मारीत होता.कालांतराने त्याने त्यांनाच लक्ष्य करीत त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून पिस्टल चोरण्याचे धाडस केले. सुदैवाने पोलिसांच्या अन्य एका पथकाने या पिस्टलचा तपास लावल्याने संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती.